Nitin Gadkari on Trucks: ट्रक चालकांसाठी नितीन गडकरींची मोठी घोषणा, ऐकून तुम्हीही आनंदाने माराल उड्या

AC Compartments in Truck: स्पष्टवक्ते आणि आपल्या कामातून ठसा उमटवणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नवी घोषणा केली.
Nitin Gadkari
Nitin GadkariDainik Gomantak
Published on
Updated on

AC Compartments in Truck: स्पष्टवक्ते आणि आपल्या कामातून ठसा उमटवणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नवी घोषणा केली. त्यांची ही घोषणा ऐकून तुम्हीही आनंदी व्हाल.

होय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, 2025 पासून सर्व ट्रकमध्ये क्रू मेंबर्ससाठी एसी कंपार्टमेंट असणे आवश्यक आहे.

एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, ज्या दिवसापासून मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला, त्या दिवसापासून मला ट्रकच्या केबिनमध्ये एसी कंपार्टमेंट सुरु करायचे आहे.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या खर्चाबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत

गडकरी म्हणाले की, ट्रकच्या वाढत्या किमतीबाबत लोक सातत्याने तक्रारी करत आहेत. असे असतानाही ट्रकच्या केबिनमध्ये एसीची सुविधा दिली जात नाही.

पण आज या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी ट्रक चालकाच्या केबिनमध्ये एसी अनिवार्य करणाऱ्या फाईलवर सही केली आहे. गडकरी पुढे म्हणाले की, ट्रक चालवणाऱ्या लोकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

Nitin Gadkari
Vijay Sardesai Meets Nitin Gadkari: वेस्टर्न बायपास स्टिल्टसह 'या' विषयांवर विजय सरदेसाईंनी घेतली गडकरींची भेट

राष्ट्रीय महामार्गावरील सुविधा सुधारण्यासाठी

राष्ट्रीय महामार्गावरील सुविधा सुधारण्यासाठी केंद्र सरकार (Government) सातत्याने प्रयत्न करत असल्याची ग्वाहीही केंद्रीय मंत्र्यांनी दिली. गडकरी म्हणाले की, माझे मंत्रालय 570 रोड साइड सुविधा केंद्रांवर काम करत आहे.

यापैकी 170 निविदा दाखल झाल्या असून कामही सुरु झाले आहे. महामार्गाच्या प्रत्येक 50 किलोमीटरवर एक सुविधा निर्माण करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

लेन ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देण्याची गरज आहे

रस्ते अपघातातील मृत्यू आणि ते कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत गडकरींनी चिंता व्यक्त केली. गडकरी म्हणाले की, लेन ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देण्याबरोबरच रस्त्यांची उत्तम रचना आणि चालकांना योग्य नियमांचे पालन करण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari: नितीन गडकरींनी दिली आनंदाची बातमी, हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांना...!

दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यानंतर गडकरींनी ही घोषणा केली आहे. येथे त्यांनी वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क असा ट्रकमधून प्रवास केला. ट्रिप दरम्यान, ट्रक ड्रायव्हरने त्यांना यूएस आणि भारतातील ट्रक ड्रायव्हर्सच्या कामाच्या परिस्थितीमधील फरक सांगितला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com