FASTag बदलण्याची कटकट मिटली! गडकरींनी लॉन्च केली 'OneTag' सेवा; फिजिकल टॅग न बदलता बँक करता येणार पोर्ट

Nitin Gadkari Launches OneTag FASTag Portability System: महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली.
Nitin Gadkari Launches OneTag FASTag Portability System
nitin gadkariDainik Gomantak
Published on
Updated on

Nitin Gadkari Launches OneTag FASTag Portability System: महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली. जर तुम्हाला तुमच्या गाडीवर लावलेल्या फास्टॅगची बँक बदलायची असेल, तर आता जुना फास्टॅग काढून नवीन टॅग लावण्याची अजिबात गरज भासणार नाही.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत आयोजित 'ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026' मध्ये 'OneTag' या सुविधेचा शुभारंभ केला. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या या नव्या उपक्रमामुळे NETC फास्टॅग वापरकर्ते कोणताही नवीन फिजिकल टॅग न खरेदी करता आपली फास्टॅग बँक सहज पोर्ट करु शकणार आहेत.

Nitin Gadkari Launches OneTag FASTag Portability System
Nitin Gadkari: 'विनंती', 'मागणी', 'अपेक्षा'! तीन शब्दांच्‍या शाली खांद्यावर घेऊन गडकरींनी गोवा सरकारला मारले जोडे

आतापर्यंत FASTag जारी करणारी बँक बदलायची असल्यास जुना टॅग बंद करुन, नवीन बँकेकडून टॅग मागवणे आणि तो गाडीच्या काचेवर चिकटवणे ही प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ होती. मात्र 'OneTag' मुळे ही संपूर्ण डोकेदुखी कायमची मिटणार आहे. आता बँक पोर्ट केल्यानंतरही तुमच्या गाडीची FASTag ID आणि वाहनाचा नोंदणी क्रमांक तोच राहील, फक्त त्याला जोडलेली बँक डिजिटल पद्धतीने बदलेल.

Nitin Gadkari Launches OneTag FASTag Portability System
Nitin Gadkari: 'गडकरींनी गोव्याला काही कमी पडू दिले नाही'; मुख्यमंत्री सावंत, गुदिन्होंची स्तुतीसुमने, 4200 कोटींच्‍या प्रकल्‍पांचे भूमिपूजन

ही संपूर्ण पोर्टेबिलिटी प्रक्रिया एनएचएआयच्या (NHAI) 'Rajmargyatra' या मोबाईल ॲपवरुन अत्यंत सोप्या पद्धतीने पूर्ण करता येईल. ॲपवर वापरकर्त्याची पात्रता तपासून, सुरक्षा पडताळणी आणि पसंतीची नवीन बँक निवडून ही डिजिटल प्रक्रिया पूर्ण होईल; त्यामुळे चालकांना कोणत्याही फास्टॅग सेंटरला फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही.

Nitin Gadkari Launches OneTag FASTag Portability System
The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

या नव्या व्यवस्थेमध्ये जुन्या आणि नव्या बँकांसाठी (Bank) स्पष्ट नियमावली तयार करण्यात आली. जुनी बँक ग्राहकाचा शिल्लक राहिलेला वॉलेट बॅलन्स रिफंड करेल आणि जुने व्यवहार पूर्ण करेल, तर नवीन बँक ग्राहकाची ऑनबोर्डिंग प्रक्रिया पूर्ण करुन सेवा सुरु करेल. NPCI या संपूर्ण प्रक्रियेसाठी केंद्रीय तांत्रिक नेटवर्क पुरवणार आहे. वारंवार नवीन प्लास्टिक फास्टॅग तयार करणे आणि वितरीत करणे यावर होणारा प्रचंड प्रशासकीय खर्च या तंत्रज्ञानामुळे वाचणार आहे. महामार्गांवर डिजिटल टोलिंग अधिक सुलभ आणि सुरक्षित बनवण्याच्या दृष्टीने नितीन गडकरींनी घेतलेला हा निर्णय देशभरातील कोट्यवधी वाहनधारकांसाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bank Employees Strike September 28 2026
Nitin Gadkari ashamed Mumbai Goa Highway delay
Jan Dhan Accounts In Goa
 Bank Of Baroda Data Leak 1tb Dark Web
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com