कमी किंमतीत मिळणार 'ही' कार पण..

परंतु विक्रीच्या बाबतीत त्यांना यश मिळवता आले नाही म्हणून..
nissan magnite compact suv prices features ex showroom prices base model tuts
nissan magnite compact suv prices features ex showroom prices base model tutsDainik Gomantak

जपानी ऑटो कंपनी निसानसाठी भारतीय बाजारपेठेचा आतापर्यंतचा प्रवास काही खास राहिलेला नाही. मायक्रा, सनी, टेरानो आणि किक्स सारखी वाहने लाँच करण्यात आली होती, परंतु विक्रीच्या बाबतीत त्यांना यश मिळवता आले नाही. कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइटने निसानचे नशीब बदलले. अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज, कॉम्पॅक्ट एसयूव्ही निसान मॅग्नाइटची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची कमी किंमत.

त्याची एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. जपानी कंपनीने या SUV मध्ये 205mm ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे, जी भारतातील रस्त्यांसाठी चांगली आहे. कंपनीने यामध्ये 2,500mm लांबीचा व्हीलबेस दिला आहे. त्यामुळे वाहनाच्या केबिनला जागा मिळते. यात 336 लीटर बूट स्पेस आहे.

nissan magnite compact suv prices features ex showroom prices base model tuts
आर बाप, जुन्या कार-बाईकसाठी नवा नियम, 1 एप्रिलपासून होणार 'एवढा' दंड

रेनॉल्ट किगर, टाटा नेक्सॉन आणि किया सोनेट या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कमी असले तरी, मॅग्नाइटची बूट स्पेस अद्वितीय डिझाइनमुळे बाकीच्या तुलनेत अधिक वापरण्यायोग्य असल्याचा कंपनीचा दावा आहे. नियानची ही एसयूव्ही सब-कॉम्पॅक्ट सेगमेंटमधील सर्वाधिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यात 8-इंच टचस्क्रीन, 7-इंच TFT सह संपूर्ण डिजिटल (Digital) इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, पुश-बटण स्टॉप/स्टार्ट, JBL साउंड सिस्टम, क्रूझ कंट्रोल यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतो. या व्यतिरिक्त, मॅग्नाइटला 360 डिग्री सराउंड व्ह्यू फीचर देखील मिळते, जे पार्किंगसाठी उपयुक्त ठरते.

कंपनीने या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये सुरक्षेचीही विशेष काळजी घेतली आहे. ASEAN NCAP चाचणीमध्ये 4-स्टार रेटिंग मिळालेल्या या वाहनाला पुढील बाजूस 2 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. याशिवाय व्हेईकल डायनॅमिक्स कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, एबीएस, रिव्हर्स पार्किंग (parking) कॅमेरा, रिव्हर्स पार्किंग सेन्सर यासारखे सेफ्टी फीचर्स मॅग्नाइटमध्ये देण्यात आले आहेत. या आलिशान कारच्या एक्स-शोरूम किमती 5.76 लाख रुपयांपासून सुरू होतात आणि टॉप मॉडेलची किंमत 9.98 लाख रुपयांपासून सुरू होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com