Nissan Magnite: निसान इंडियाची हनुमान उडी, थेट आयसीसीसोबत करार

निसान कार ICC T20 विश्वचषक 2022 ची अधिकृत प्रायोजक बनली आहे.
Nissan Magnite
Nissan MagniteDainik Gomantak

Nissan Magnite: निसान मोटर्सचे आलिशान कार मार्केटमध्ये मोठ्ठं नाव आहे. निसान इंडिया मोटर्सने थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी करार केला आहे. निसान मोटर इंडियाची मॅग्नाइट कार ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या ICC T20 विश्वचषक 2022 ची अधिकृत प्रायोजक बनली आहे. या भागीदारीमुळे निसान मोटर इंडियाच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली आहे. 'निसान कार आणि ICC T20 विश्वचषक स्पर्धा एकत्र आल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. निसान मॅग्नाइट कार सलग सातव्यांदा ICC क्रीडा स्पर्धेची अधिकृत प्रायोजक बनली आहे. निसान मॅग्नाइट भारतासह 15 विविध मार्केटमध्ये ग्राहकांच्या पसंतीची कार ठरली आहे.' असे राकेश श्रीवास्तव म्हणाले.

Nissan Magnite
7th Pay Commission: चांदी रे चांदी सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! या राज्याने दिली मोठी भेट

डिसेंबर 2020 मध्ये निसान मोटर्सने निसान मॅग्नाइट (Nissan Magnite) कार लाँच केली. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.97 लाख रुपये आहे. Nissan Magnite ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे आणि आतापर्यंत एकूण 1,00,000 पेक्षा जास्त बुकिंग झाले आहे. अशी माहिती कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

निसान मोटर्सची ऑगस्टमध्ये एकूण 8,915 युनिट्सची विक्री झाली, त्यापैकी 3,283 युनिट्स देशांतर्गत बाजारात विकली गेली. तर 5,632 कार निर्यात झाल्या. निसानच्या मॅग्नाइटच्या अधिक विक्रीमुळे कंपनीने घाऊक विक्रीत 29 टक्के वाढ झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com