Budget 2023: अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे 15 दिवस उरले आहेत. अशा स्थितीत प्रत्येक क्षेत्र सरकारकडून आशा घेऊन बसले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सांगितले की, आम्हाला मध्यमवर्गीय लोकांच्या समस्या समजतात. सध्याच्या सरकारने मध्यमवर्गावर कोणताही नवीन कर लादलेला नाही, याची आठवणही त्यांनी करुन दिली.
सितारामन यांनी पुढे सांगितले की, आमच्या सरकारने 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. आमच्या सरकारने (Government) भांडवली खर्च 7.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे. याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. जाणून घेऊया मध्यमवर्गीयांसाठी अर्थमंत्री काय म्हणाल्या?...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की, 'व्यवसाय सुलभ करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 100 स्मार्ट शहरे आणि 27 शहरांमध्ये मेट्रो रेल्वे नेटवर्क तयार करण्यासारख्या उपाययोजना केल्या आहेत.' हा वर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने मध्यमवर्गीयांसाठी सरकार अधिक उपाययोजना करु शकते, असे आश्वासनही त्यांनी मध्यमवर्गीयांना दिले आहे. त्या पुढे म्हणाल्या, "मला त्या लोकांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजतात. आमच्या सरकारने मध्यमवर्गीयांसाठी खूप काही केले आहे आणि यापुढेही आम्ही हे काम सुरु ठेवू.'
2020 पासूनच आमचे सरकार प्रत्येक अर्थसंकल्पात भांडवली खर्च वाढवण्यावर भर देत असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, 'चालू आर्थिक वर्षात म्हणजे 2022-23 मध्ये भांडवली खर्च 7.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, कारण असे केल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारत आहे.'
निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, 'आमचे सरकार बँकिंग क्षेत्रासाठी 4R वर काम करत आहे जसे की ओळख, पुनर्भांडवलीकरण, संकल्प आणि सुधारणा. या धोरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नॉन परफॉर्मिंग अॅसेट (एनपीए) कमी झाले आहेत.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.