नवीन वर्षातील नियम तुमच्या खिशाला लावणार कात्री!

पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अनेक नियम (Rules) बदलतील.
Money


Money

Dainik Gomantak 

Published on
Updated on

कोरोनाच्या सावटाखाली हे वर्ष जवळपास संपत चाललयं आहे, अवघ्या काही दिवसांनी नवीन वर्ष सुरु होणार. येणारे नवीन वर्ष सोबत अनेक बदलही घेऊन येत आहे. या बदलांमध्ये आर्थिक बदलांचाही समावेश होतो. पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अनेक नियम बदलतील. या नियमांमध्ये बँकेतून पैसे काढण्यापासून ते जमा करणे, डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Credit card) यांच्याशी संबंधित नियमांचा समावेश आहे. या नियमांबद्दल जाणून घेऊया.

डेबिट आणि क्रेडिट कार्ड नियम

1 जानेवारीपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्याच्या पद्धतीत बदल होणार आहे. ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. आता ऑनलाइन पेमेंट करताना, तुम्हाला 16 अंकी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांकासह संपूर्ण कार्ड तपशील प्रविष्ट करावा लागणार आहे. म्हणजेच, आता मर्चेंट वेबसाइट किंवा अॅप ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंट (digital payment) दरम्यान तुमच्या कार्डचे तपशील संग्रहित करु शकत नाहीत. तसेच, आधीच सेव्ह केलेली माहिती देखील हटविली जाईल.

एटीएममधून पैसे काढणे महागणार

नवीन वर्षापासून ग्राहकांना मोफत एटीएम व्यवहार मर्यादा ओलांडण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. जूनमध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना 1 जानेवारी 2022 पासून एटीएममधून विनामूल्य मासिक पैसे काढण्यासाठी शुल्क वाढवण्याची परवानगी दिली होती. प्रत्येक बँक प्रत्येक महिन्याला काही विशिष्ट व्यवहारांना रोख आणि नॉन-कॅशमध्ये विनामूल्य परवानगी देत असे. मात्र 1 जानेवारीपासून मोफत व्यवहाराची मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला काही शुल्कही भरावे लागणार आहेत. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अॅक्सिस बँक किंवा इतर बँकेच्या एटीएममधील विनामूल्य मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक व्यवहारांवर 21 रुपये अधिक जीएसटी लागू होईल.

पोस्ट पेमेंट बँकेतून पैसे काढणे महागडे होणार

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेधारकांना एका मर्यादेपासून रोख रक्कम काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत तीन प्रकारची बचत खाती उघडली जाऊ शकतात. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या मते, बेसिक सेव्हिंग अकाउंटमधून दर महिन्याला चार वेळा पैसे काढता येतात. मात्र यानंतर ग्राहकांच्या प्रत्येक पैसे काढण्यासाठी किमान 25 रुपये आकारावे लागतील. मूलभूत बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com