LPG: LPG पासून ते बॅंकेपर्यत...नवीन वर्षात हे होणार बदल

LPG: हे सगळे बदल आर्थिक व्यवहारांसोबत निगडीत आहेत. बॅंकेच्या व्यवहारापासून ते एलपीजी पर्यंत अनेक बाबींमध्ये बदल झाले आहेत.
LPG Cylinders
LPG Cylinders Dainik Gomantak
Published on
Updated on

LPG: आज नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच सामान्य माणसासंबंधित काही महत्वाच्या बाबींमध्ये बदल झाला आहे. हे सगळे बदल आर्थिक व्यवहारांसोबत निगडीत आहेत. बॅंकेच्या व्यवहारापासून ते एलपीजी पर्यंत अनेक बाबींमध्ये बदल झाले आहेत. जाणून घेऊयात कोणत्या क्षेत्रात बदल झाले आहेत.

1. एलपीजी( LPG)च्या किंमतीत वाढ

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅसच्या कंपन्या एलपीजीच्या किंमतीत बदल करतात. यावेळी जानेवारीच्या महिन्यातदेखील काही बदल आले आहेत. घरगुती वापरात असणाऱ्या गॅसमध्ये काहीच बदल झाले नाहीत. तर, कमर्शियल सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे.

2. GST Invoicing की सीमा पाच कोटीपर्यंत

GST E-Invoicing किंवा इलेक्ट्रिक बीलची याआधीची सीमा 20 कोटीपर्यत होती आता मात्र त्यात कपात करुन ती 5 कोटीपर्यत केली आहे. हा नियम 2023 च्या पहिल्या दिवसापासून लागू होणार आहे.त्यामुळे ज्यांचा बिझनेस 5 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना इलेक्ट्रिक बिल जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LPG Cylinders
Pay World: डिजिटल सुविधांमध्ये ग्रामीण भारत अजून सक्षम होणार, ही कंपनी करतेय भरीव काम

3.बॅकांची जबाबदारी वाढेल

RBI ने दिलेल्या निर्देशानुसार बॅंक लॉकरच्या नियमांमध्ये बदल करण्यात आली आहे. हे बदल 1 जानेवारी 2023 पासून लागू केले जातील.ग्राहकांच्या वस्तुला काही नुकसान झाले तर त्यासाठी बॅंका( Bank ) जबाबदार असतील असे निर्देश देण्यात आले आहेत.

4. गाडी खरेदी करण्यासाठी लागणार करावा लागणार जास्त खर्च

2023 च्या सुरुवातीपासूनच मारुती सुझुकी , हुडांई, एमजी मोटर्स या गाड्यांच्या किंमती वाढल्याचे दिसून येत आहे.त्याचबरोबर टाटा मोटर्स ने 2 जानेवारीपासून आपल्या कमर्शिअल गाड्यांची किंमत वाढवणार असल्याची घोषणा केली आहे.

5. HDFC क्रेडिट कार्ड बाबतचे नियम

HDFC क्रेडिट कार्ड पेमेंट वर मिळणारे रिवॉर्ड प्वाइंट्स (Reward Points)चे नियमांमध्ये बदल होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com