अॅपलने नवीन आयफोन एसइ (iPhone SE) लाँच केला आहे. याआधी अॅपलने या फोनचे दोन मॉडेल बाजारात आणले होते. मूळ फोन 2016 मध्ये लॉन्च झाला होता. त्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे अॅपलने ही सिरिज सुरू ठेवली आहे. फोनच्या 64 जीबी मॉडेलची किंमत 43,900 रुपये आहे.
बॅटरीमध्ये सुधारणा
नवीन आयफोन (iphone) एसइची मुख्य बॉडी 2020 मॉडेलसारखीच आहे. हा फोन 64GB, 128GB आणि 256GB मॉडेलमध्ये उपलब्ध असेल. iPhone SE 2022 सब-6GHz 5G ला सपोर्ट करतो. अॅपलच्या (Apple) दाव्यानुसार फोन सुधारित बॅटरी लाइफसह येतो.
कॅमेरा
फोनमध्ये एकच 12-मेगापिक्सेल रियर कॅमेरा (Camera) आणि 7-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. तथापि, A15 बायोनिक प्रोसेसरमुळे फोनमध्ये काही सॉफ्टवेअर-आधारित फोटोग्राफी सुधारणा झाल्या आहेत. यामध्ये डीप फ्यूजन आणि HDR 4 समाविष्ट आहे.
फेस आयडी नाही
फोन FaceID सह येत नाही. यात बायोमेट्रिक अनलॉकिंगसाठी टच आयडी सेन्सरचा समावेश आहे. फोनचा पुढचा आणि मागचा पॅनल ग्लासने बनला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.