Burger Price Hike: बर्गरची साईज नव्हे किंमत वाढली, कंपनीकडून तिसऱ्यांदा दरवाढीची घोषणा

Burger Price Hike: आता नववर्षाचा पहिला आठवडा संपत असतानाच पुन्हा बर्गरची किंमत वाढवण्यात आली आहे.
Burger Price Hike
Burger Price HikeDainik Gomantak
Published on
Updated on

Burger Price Hike: भारतासह अमेरिका आणि युरोपमध्ये महागाईचे सावट असतानाच आता तरुणाईचे आवडते खाद्यपदार्थ असलेल्या बर्गरची किंमत वाढवण्याचा निर्णय मॅकडोनाल्ड कंपनीने घेतला आहे. त्यामुळे आता चविष्ट बर्गरचे सेवन करणे हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. तसेच ज्या लोकांना सातत्याने बर्गर (Burger) खायची सवय आहे, त्यांना त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे आता गॅस, खाद्यतेल आणि इंधनाच्या किंमती वाढल्यानंतर आता बर्गरच्याही किंमती वाढल्याने हिवाळ्यात सामान्यांना महागाईच्या फटका बसणार आहे.

काही महिन्यांपूर्वीच मॅकडोनाल्ड कंपनीने बर्गरची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता नव्या वर्षाच्या (New Year) पहिल्याच आठवड्यात पुन्हा बर्गरच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.

जपानमध्ये मॅकडोनाल्ड कंपनीने किमती वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे भारतातही (India) आगामी काळात बर्गरच्या किंमती गगणाला भिडण्याची शक्यता दर्शवली जात आहे. न्यूज एजेन्सी रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, मॅकडोनाल्ड्सची उपकंपनी असलेल्या जपान लिमिटेडने गेल्या दहा महिन्यांच्या काळात तिसऱ्यांदा बर्गरच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Burger Price Hike
Nirmala Sitharaman Budget 2022: 2022 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केल्या 'या' 10 मोठ्या घोषणा, आजही...!

येत्या 16 जानेवारीपासून मूळ किंमतीपेक्षा 80 टक्के जास्त किंमतीत बर्गरची विक्री केली जाणार आहे. बर्गर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, वाहतूक, वीजेची किंमत आणि वाढलेल्या करांमुळे कंपनीने बर्गरची किंमत वाढवली आहे.

त्यामुळे आता जपानमध्ये 140 येनला मिळणारा बर्गर तब्बल 220 येनला मिळणार आहे. तसेच पानमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या बिग मॅक हॅमबर्गरची किंमत 410 येनवरून 450 येन इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे आता मॅकडोनाल्ड्सने जपानमध्ये बर्गरच्या किंमतीत वाढ केल्यामुळे त्याचे विपरित परिणाम भारतात विक्री होणाऱ्या बर्गरवरही होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com