Mother's Day 2023: मातृदिनानिमित्त आईला द्या आर्थिक सुरक्षेचे 'हे' अनोखे गिफ्ट

मदर्स डेच्या निमित्ताने अनेकजण आईला स्मार्ट वॉच, कार , मोबाईल यासारखे गिफ्ट देतात. त्याऐवजी, आर्थिक नियोजन त्यांच्यासाठी एक चांगली गिफ्ट ठरू शकते.
Mother's Day
Mother's Day Dainik Gomantak
Published on
Updated on

Mother's Day 2023: मदर्स डे निमित्त्याने तुम्ही आईसाठी आर्थिक नियोजनापेक्षा चांगली भेट कोणती? आई कठीण काळातही मुलांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करते, अन्न, निवारा आणि शिक्षणापासून ती मुलांसाठी सर्वतोपरी काळजी घेते.

ती आपल्या मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करते, त्यासाठी दिवस रात्र एक करुन पैसा जमवते. पण अनेकदा ती स्वतःबद्दल आणि वृद्धापकाळातील आर्थिक तूटपूंजी करु शकते. अशावेळी तुम्ही तिला मदत करु शकतात.

मातृदिनानिमित्त लोक आपल्या आईला घड्याळ, स्मार्टफोन किंवा अगदी कारसारख्या मौल्यवान वस्तू गिफ्ट करतात. अशा गिफ्टने आईच्या पैशाचे टेन्शन दूर होऊ शकत नाही. त्यापेक्षा, या दिवशी तुम्ही तुमच्या आईला तिच्या वृद्धापकाळातही नियमित उत्पन्न मिळेल आणि आर्थिक मदत होईल अशा आर्थिक नियोजनासंदर्भात कोणतेही आर्थिक उत्पादन देखील देऊ शकता. आम्ही तुम्हाला असे ५ सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय सांगणार आहोत.

Mother's Day
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
  • गोल्ड ईटीएफ

गोल्ड ईटीएफ या म्युच्युअल फंडात फक्त सोन्याच्या (Gold) दरानुसार परतावा दिला जातो.. सध्या सोन्याचा भाव सुमारे ६२,००० रुपये आहे. पण सोन्याच्या वाढत्या दरामुळे यातही भविष्यात चांगला परतावा मिळेल अशी अपेक्षा आहे. म्हणूनच आज तुम्ही तुमच्या सोन्यासारख्या आईला मदर डे च्या निमित्ताने गोल्ड ईटीएफ भेट देऊ शकतात.

  • डेट म्युच्युअल फंड

ज्येष्ठ नागरिकांसाठी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय आहे. पण इक्विटीऐवजी त्यांच्यासाठी डेट म्युच्युअल फंडात पैसे (Money) गुंतवणे फायद्याचे राहिल. यामध्ये कोणताही धोका नाही आणि तुमच्या आईला (Mother) एफडीमधून चांगला परतावा मिळू शकतो. वृद्ध लोकांसाठी डेट फंड अधिक चांगले आहेत, कारण अशा लोकांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता नसते. लहान वयातच इक्विटी एक्सपोजर घेणे चांगले ठरु शकते.

  • आवश्यक आरोग्य विमा

आरोग्य विमा भेट देणे ही सर्वोत्तम गिफ्टपैकी एक असू शकते. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, भारतातील (India) केवळ 30 टक्के महिलांकडेच (Women) आरोग्य विमाचे सुरक्षा कवच आहे. चांगल्या आरोग्य सेवेसाठी हे खूप महत्वाचे आहे.

शहरातील बहुतांश महिला काम आणि घर यांच्यामध्ये अडकल्या आहेत. त्यांच्या प्रकृतीकडे फारसे लक्ष देता येत नाही. हा त्यांच्या लाइफस्टाइलचा एक भाग बनतो. निद्रानाश, वाढता ताण आणि नैराश्यसारख्या समस्या त्यांना भेडसावत असतात. त्यामुळेच त्यांना मधुमेह, पाठीचा त्रास, थायरॉईड, हृदयविकार, कर्करोग सारख्ये आजार बळावतात.

  • पेन्शन योजना

तुमच्या उत्पन्नाचा एक छोटासा भाग तुमच्या आईला आर्थिक स्थैर्य देऊ शकता. कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आणि त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वर्षांत कोणत्याही अनिश्चिततेपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी कंपनीद्वारे पेन्शन योजना तयार केल्या जातात.

भारतातील जवळपास सर्व विमा कंपन्या पेन्शन योजना देतात. अशा योजनांसाठी मासिक आधारावर पेमेंट केले जाऊ शकते. काही योजना कमाल आयुष्याच्या पेन्शन पॉलिसीसह एकरकमी पेमेंटवर त्वरित फायदे देतात.

  • ज्येष्ठ नागरिक बचत योजना

60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक या योजनेचा लाभ घेउ शकतात. पालकांसाठी ही एक उत्तम गुंतवणूक योजना आहे. या सरकारी योजनेत शून्य धोका आहे आणि खाते उघडणे खूप सोपे आहे.

योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे, परंतु तो पुढे तुम्हाला तीन वर्षांसाठी वाढवण्याचा पर्याय देखील मिळतो. त्यावर 7 टक्के व्याजदर आहे. यामध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com