Milk Price Hike: केजरीवालांच्या दिल्लीत महागाईचा भडका, मदर डेअरीने पुन्हा वाढवले ​​दुधाचे दर

Mother Dairy: मदर डेअरीने दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे.
Mother Dairy
Mother Dairy Dainik Gomantak

Mother Dairy Milk Price Hike: मदर डेअरीने दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. मदर डेअरीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, फुल क्रीम दुधाची किंमत 63 रुपये प्रति लिटरवरुन 64 रुपये प्रति लीटर झाली आहे. टोकन दुधाची किंमत 48 रुपये प्रति लिटरवरुन 50 रुपये झाली असली तरी फुल क्रीम दुधाच्या 500 मिली पॅकच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

मदर डेअरीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, फुल क्रीम दुधाची किंमत 63 रुपये प्रति लिटरवरुन 64 रुपये प्रति लीटर झाली आहे. तर टोकन दुधाची किंमत 48 रुपये प्रति लिटरवरुन 50 रुपये झाली असली तरी फुल क्रीम दुधाच्या 500 मिली पॅकच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मदर डेअरी ही दिल्ली-एनसीआर बाजारपेठेतील सर्वात मोठी दूध पुरवठादार असून ती पॉली पॅक आणि व्हेंडिंग मशीनद्वारे दररोज 30 लाख लिटरहून अधिक दूध पुरवते.

Mother Dairy
PM Kisan: सरकारकडून आर्थिक मदत हवी का? लगेच करा नोंदणी; खात्यात येतील पैसे

सामान्य लोकांचे घरगुती बजेट बिघडेल

दुधाच्या (Milk) दरवाढीचा परिणाम यावेळी सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे, कारण अन्नधान्याची किमती आधीच उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत.

Mother Dairy
PM Kisan: 13 व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 30 नोव्हेंबरपर्यंत खात्यात येणार 2000 रुपये !

ऑक्टोबरमध्येही दर वाढले होते

16 ऑक्टोबर रोजी, मदर डेअरीने दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतातील काही इतर बाजारपेठांमध्ये (Market) फुल क्रीम दूध आणि गायीच्या दुधाच्या किमती प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवल्या होत्या. मार्च आणि ऑगस्टमध्येही सर्व प्रकारांच्या किमती प्रति लीटर 2 रुपयांनी वाढल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com