

MoSPI Service Production Index Using UPI Merchant Codes: आपल्या रोजच्या वापरातील युपीआय व्यवहारांचा वापर आता केवळ पैसे पाठवण्यासाठीच नव्हे, तर देशातील खाजगी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राच्या आर्थिक प्रगतीचा अंदाज घेण्यासाठी केला जाणार आहे. यासाठी सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाकडून एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला. देशाच्या एकूण सेवा क्षेत्राच्या जीव्हीए (Gross Value Added) मध्ये शिक्षणाचा वाटा सुमारे 7.2 टक्के आणि आरोग्याचा वाटा जवळपास 3 टक्के इतका मोठा आहे. मात्र, या दोन्ही क्षेत्रांचा दरमहा मिळणारा खर्च सरकारकडे औपचारिकपणे उपलब्ध होत नव्हता.
हा डेटा गोळा करण्यासाठी सरकार आता युपीआय मर्चेंट कोडचा प्रभावी वापर करणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शाळा, कॉलेज किंवा व्होकेशनल इन्स्टिट्यूटची फी युपीआय द्वारे भरते, तेव्हा त्या विशिष्ट मर्चेंट कोडमुळे ती रक्कम शिक्षणासाठी खर्च झाल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर हा डेटा शिक्षण क्षेत्रातील महागाई दराशी (CPI For Education) जुळवून प्रत्यक्ष शैक्षणिक वाढीचा अचूक अंदाज बांधला जातो. अगदी याच पद्धतीने डॉक्टर, क्लिनिक, पॅथोलॉजी आणि हॉस्पिटल्समध्ये युपीआयने केलेल्या पेमेंटचे मर्चेंट कोड्स आरोग्य क्षेत्राशी संबंधित खर्च आणि महागाईशी (CPI-Health) जोडले जातील.
या नवीन प्रणालीमुळे जुलै 2026 पासून लागू झालेल्या या इंडेक्सची व्याप्ती 60 टक्क्यांवरुन थेट 78.4 टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. सरकारी संस्थांच्या खर्चाची माहिती सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे घेतली जाईल, तर खाजगी क्षेत्रातील उलाढाल युपीआयच्या माध्यमातून समोर येईल. या संपूर्ण प्रक्रियेत नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती जाणार नाही, तर संपूर्ण डेटा गोळा करुन देशाच्या आर्थिक विकासाचे योग्य नियोजन करण्यासाठी सरकारला मदत होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.