मोदी सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना 1350 रुपयांत मिळणार DAP बॅग

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी सरकारने (Narendra Modi government) बुधवारी एक निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला आहे.
Diammonium Phosphate
Diammonium PhosphateDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी सरकारने बुधवारी एक निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला आहे. याअंतर्गत मोदी सरकारने खतांच्या वाढलेल्या किमतींच्या बोज्यातून शेतकऱ्यांची सुटका केली. मोदी सरकारच्या (Modi Government) या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामात डाय अमोनियम फॉस्फेट (DAP) ची पिशवी 1350 रुपयांना मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. खरं तर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने कच्च्या मालचा तुटवडा जाणवत आहे. याचाच परिणाम म्हणून जगभरात खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली. मात्र आता देशातील शेतकऱ्यांना मोदी सरकारने दिलासा दिला.(Modi government's relief to farmers Diammonium phosphate bag will now be available at Rs 1350)

Diammonium Phosphate
LIC IPO: पॉलिसीधारकांना प्रत्येक शेअरवर मिळणार सूट

अनुदान म्हणून 2501 रुपये खर्च सरकार उचलणार

मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) म्हणाले की, 'शेतकऱ्यांना डीएपी बॅग जुन्या किमतीत म्हणजेच 1350 रुपयांना मिळणार आहे. तर अनुदान म्हणून 2501 रुपये खर्च सरकार उचलणार आहे.' ते पुढे म्हणाले की, ''आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या संकटामुळे खतांच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे डीएपीची एक बॅग 3851 रुपयेला असली तरी सरकार शेतकऱ्यांना (Farmers) 1350 रुपये प्रति बॅग डीएपी देणार आहे. त्यामुळे उर्वरित 2501 रुपये अनुदानावर येणार आहेत.'' गेल्या वर्षी सरकार डीएपीच्या एका बॅगवर 512 रुपये अनुदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

या खरीप हंगामाच्या अनुदानावर सरकार 60939 कोटी रुपये खर्च करणार

मंत्रिमंडळात खत अनुदानाबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, 'डीएपी तसेच इतर खतांवरील सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.' यासाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती देताना ते म्हणाले की, 'या खरीप हंगामात सरकारने अनुदानासाठी 60939 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर 2013-14 च्या खरीप हंगामात खत अनुदान म्हणून 29426 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसेच गेल्या वर्षी अर्थसंकल्प 57150 कोटींचा होता.' त्यांनी पुढे सांगितले की, '2013-14 मध्ये खत अनुदान 71280 कोटी होते, ते वाढवून 162184 कोटी करण्यात आले आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com