Rozgar Mela: मोदी सरकारने उघडला नोकऱ्यांचा खजिना, एका झटक्यात 51 हजार तरुणांना दिली नियुक्ती पत्रे

Rozgar Mela: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 51 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली. रोजगार देणे हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi on Rozgar Mela: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 51 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली. रोजगार देणे हे आमचे सर्वात मोठे प्राधान्य असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारताचा (India) लवकरच टॉप-3 अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होणार आहे.

रोजगार मेळाव्याअंतर्गत पंतप्रधानांनी या युवकांना जॉइनिंग लेटर दिले. देशात 45 ठिकाणी रोजगार मेळावे घेण्यात आले.

रोजगार मेळाव्यात केंद्रीय गृह मंत्रालय, CRPF, BSF, सशस्त्र सीमा बल, आसाम रायफल्स, CISF, ITBP आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसह दिल्ली पोलिसांमध्येही भरती करण्यात आली आहे.

दरम्यान, 22 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याचा पहिला टप्पा सुरु केला. 2023 च्या अखेरीस 10 लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे त्यांनी लक्ष्य ठेवले आहे.

पीएम मोदींनी गेल्या 9 महिन्यांत 7 रोजगार मेळ्यांमध्ये 4 लाख 48 हजारांहून अधिक लोकांना सामील होण्याचे पत्र दिले आहे.

PM Narendra Modi
PM Modi on Rozgar Mela: रोजगार मेळाव्यातील 1,250 युवकांना मिळणार नियुक्तीपत्रे; पंतप्रधान मोदी करणार संबोधित

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित रोजगार मेळाव्यात या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.

आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले की, ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल, पर्यटन आणि खाद्य प्रक्रिया क्षेत्रांमध्ये वेगाने वाढ होऊन तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.

ते पुढे म्हणाले की, एकट्या पर्यटन क्षेत्राने 2030 पर्यंत अर्थव्यवस्थेत 20 लाख कोटी रुपयांचे योगदान देणे अपेक्षित आहे आणि 13-14 कोटी नवीन रोजगार निर्माण करण्याची या क्षेत्राची क्षमता आहे.

तरुणांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रत्येक क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. खाद्यान्नापासून ते औषध उद्योगापर्यंत, अवकाशापासून स्टार्टअपपर्यंत. जेव्हा प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल तेव्हा अर्थव्यवस्था वाढेल.

फार्मास्युटिकल उद्योगाचे उदाहरण देत पंतप्रधान म्हणाले की, सध्या 4 लाख कोटी रुपयांचे हे क्षेत्र 2030 पर्यंत 10 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ या दशकात फार्मास्युटिकल उद्योगात तरुणांची खूप गरज भासेल.

रोजगाराच्या संधी निर्माण होतील. वाहन क्षेत्रही प्रगतीच्या वाटेवर असून ते पुढे नेण्यासाठी युवाशक्तीची गरज असल्याचेही ते म्हणाले. यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असे पंतप्रधान म्हणाले.

PM Narendra Modi
Rojgar Mela 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) मते, हा रोजगार मेळा रोजगार निर्मितीसाठी पंतप्रधानांच्या वचनबद्धतेला प्राधान्य देण्याच्या दिशेने उचलेले एक पाऊल आहे.

ते पुढे म्हणाले की, यामुळे रोजगार (Employment) निर्मितीला चालना मिळण्याची शक्यता आहे आणि राष्ट्र उभारणीत तरुणांचा सहभाग आणि सक्षमीकरणाची संधी उपलब्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com