मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, MSP वाढवण्यास दिली मान्यता

केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्यास मान्यता दिली आहे.
Farm
FarmDainik Gomantak

केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022-23 पीक वर्षासाठी धान्यासाठी एमएसपी 100 रुपयांनी वाढवून 2,040 रुपये प्रति क्विंटल केला आहे. बुधवारी मंत्रिमंडळानेही त्याला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (modi government hikes msp for kharif crops could soon allow traders to ship out wheat know why)

दरम्यान, भारत (India) सरकार लवकरच व्यापाऱ्यांना सुमारे 1.2 दशलक्ष टन गहू पाठवण्याची परवानगी देण्याचा विचार करु शकते. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर अचानक बंदी घातल्यानंतर बंदरांवर अडकलेला माल सरकारला काढायचा आहे. मात्र, सरकारच्या (Government) परवानगीनंतरही सुमारे 5 लाख टन गहू बंदरांवर अडकून पडण्याची शक्यता आहे.

Farm
महागाई, शेतकरी, श्रमिकांचे प्रश्न मोदी सरकार सोडवू शकले नाही - नाना पटोले

काय म्हणाले अनुराग ठाकूर

मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) म्हणाले, "पेरणीच्या वेळी एमएसपीची माहिती घेतल्याने शेतकऱ्यांचे मनोबलही वाढते. आपल्या पिकाला चांगला भाव मिळेल अशी आशा त्यांना असते." यावेळी सर्व 14 खरीप पिके आणि त्यांच्या वाणांसह 17 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून जाणून घेऊया, सरकारने कोणत्या खरीप पिकावर किती एमएसपी वाढवली आहे.

गव्हाच्या निर्यातीत दिलासा मिळणे शक्यता

याव्यतिरिक्त, सरकार लवकरच व्यापाऱ्यांना सुमारे 1.2 दशलक्ष टन गहू पाठवण्याची परवानगी देण्याचा विचार करु शकते. वृत्तसंस्था रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, गेल्या महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर अचानक बंदी घातल्यापासून अनेक बंदरांवर माल अडकून पडला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com