सरकारी कंपन्यांचा विक्रीचा धडाका सुरूच; 6 लाख कोटी रुपयांच्या कंपन्यांचा होणार लिलाव

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman ) नॅशनल मोनेटाइझेशन पाईपलाईन (NMP) योजना सुरू करतील,
Modi gov. will disinvestment government companies, 6 lakh crore to be auctioned
Modi gov. will disinvestment government companies, 6 lakh crore to be auctionedDainik Gomantak
Published on
Updated on

सरकार आता निर्गुंतवणुकीद्वारे ( Disinvestment) मोठी रक्कम उभारण्यासाठी त्या साऱ्या मालमत्तांची मोठी यादी जाहीर करणार आहे. या दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman ) नॅशनल मोनेटाइझेशन पाईपलाईन (NMP) योजना सुरू करतील, ज्यामध्ये पुढील चार वर्षांत विकल्या जाणाऱ्या सरकारी मालमत्तेचा हिशेब असेल.(Modi gov. will disinvestment government companies, 6 lakh crore to be auctioned)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते एमएमपी योजना सुरू होईल

NITI आयोगाने रविवारी सांगितले की, NMP च्या माध्यमातून सरकार पुढील चार वर्षांसाठी निर्गुंतवणुकीसाठी ब्लूप्रिंट तयार करेल आणि गुंतवणूकदारांनाही स्पष्ट संदेश मिळेल. निर्गुंतवणूक, पॉवरग्रिड, हायवे इत्यादीसाठी ओळखल्या गेलेल्या कंपन्यांची यादीही अर्थमंत्री आज जाहीर करतील.

मालमत्तांची किंमत अंदाजे 6 लाख कोटी रुपये

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव (डीआयपीएएम) तुहिनकांत पांडे यांनी अलीकडेच म्हटले होते की सरकारने निर्गुंतवणुकीसाठी सुमारे 6 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तांची ओळख केली आहे. अर्थमंत्र्यांनी 2021-22 च्या अर्थसंकल्पीय भाषणातच एनएमपीचा उल्लेख केला होता.

Modi gov. will disinvestment government companies, 6 lakh crore to be auctioned
फाटलेली किंवा खराब नोट मिळालीच तर आता चिंता नको, RBI चा ग्राहकांना मोठा दिलासा

याद्वारे जमा होणारा निधी पायाभूत विकास क्षेत्रात वापरला जाईल, असे त्या म्हणाल्या होत्या . त्यांनी अर्थसंकल्पात इन्फ्रा आणि निर्गुंतवणुकीवर जास्तीत जास्त भर दिला होता. NITI आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि इतर सचिवही या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहतील.

कोरोना संकट आणि लॉकडाऊनचा फटका बसल्यानं आर्थिक अडचणींचा सामना करणारं मोदी सरकार निर्गुंतवणुकीवर भर देत आहे. सरकारी संपत्ती विकून त्या माध्यमातून पैसे मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज ही घोषणा होणार आहे पुढील 4 वर्षांत मोदी सरकार कोणकोणत्या सरकारी मालमत्ता विकणार आहे, त्याबद्दलची सविस्तर माहिती यामध्ये असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com