महागाईचा झटका, दूध दरात 5 रुपयांची वाढ

महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका
milk becomes costlier by rs 5 per liter after mother dairy and amul hike milk price
milk becomes costlier by rs 5 per liter after mother dairy and amul hike milk price Dainik Gomantak

मदर डेअरी आणि अमूलनंतर आता आणखी एका कंपनीने दुधाचे दर वाढवले ​​आहेत. याआधीच महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. होळीचा सण अद्याप पूर्णपणे मावळलेला नसताना दुधाच्या दरात ही वाढ झाली आहे. भोपाळ दूध संघाने ही वाढ केली आहे. सांची दुधाच्या दरात तीन ते पाच रुपयांपर्यंत मोठी वाढ झाली आहे.

milk becomes costlier by rs 5 per liter after mother dairy and amul hike milk price
डिझेल 25 रुपयांनी महागले, जगभरात तेल आणि इंधनाच्या किमतीत मोठी वाढ

वाढलेले दर सोमवारपासून लागू होतील, भोपाळ (Bhopal) दूध संघाने सांगितले की, दुधाच्या दरातील ही वाढ 21 मार्चपासून (सोमवार) लागू होणार आहे. मात्र, सध्या अॅडव्हान्स कार्डधारकांनी जुन्याच दराने पैसे भरल्याने त्यांना 15 एप्रिलपर्यंत जुन्याच दराने दूध (milk) मिळणार आहे. 21 मार्चपासून लागू होणारे नवीन दर अॅडव्हान्स कार्ड ग्राहकांना भरावे लागणार नसून, 15 एप्रिलपर्यंत त्यांना जुन्याच दराने दूध मिळत राहील, असे दूध संघाचे म्हणणे आहे. यानंतर 16 एप्रिलपासून त्यांनाही नवीन दरानुसार दूध दिले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com