मेगा भरती ! येत्या दीड वर्षात IT क्षेत्रात 12 लाख Openings

मागील अनेक दिवसांपासून आयटी(It Jobs) क्षेत्रालाही कोरोना महामारीचा फटका बसला आणि बऱ्याच जणांच्या नोकऱ्याही गेल्या अशातच आता आणखीन बऱ्याच संधी उपलध होतील अशी महती तद्यांकडून मिळत आहे
Mega Recruitment! 12 lakh openings in IT sector in next one and half years
Mega Recruitment! 12 lakh openings in IT sector in next one and half yearsDainik Gomantak
Published on
Updated on

येत्या एक ते दिड वर्षात आयटी सर्व्हिसेस(IT Companies) क्षेत्रात नोकरीच्या(Jobs) संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या जगभरात आयटी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. वेग वेगळ्या खाजगीसही अनेक सरकारी योजनाही आता ऑनलाईनच मिळत आहे. त्यामुळे सर्वांचीच आता या क्षेत्राला पसंती मिळत आहे. आणि त्याचमुळे आता आयटी क्षेत्रात फ्रेशर्ससाठी मेगा भरती निघणार आहेत . (Jobs In IT)

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(TCS), इन्फोसिस(Infosys), एचसीएल टेक्नोलॉजीज(HCL Technology) आणि विप्रो(Wipro) या चार मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्या जवळपास 12,00,000 फ्रेशर्सना नॊकरी देणार आहेत , तर चालू आर्थिक वर्षात या उद्योगात जवळपास 1.5 लाख फ्रेशर्सना नौकरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार अगदी लहान किंवा मध्यम अशा तसेच काही स्टार्टअप आयटी कंपन्याही बऱ्याच प्रमाणात नवीन महाविद्यालयीन पदवीधरांची भरती करून घेऊन त्यांना संधी देणार आहे असेही समजत आहे. तर दुसरीकडे आयटी क्षेत्रातील उत्त्पन्नचा विचार करता टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल आणि विप्रो एकत्रितपणे देशाच्या एकूण आयटी सेवांच्या उत्पन्नापैकी एक तृतीयांश इतके उत्त्पन्न या कंपन्यांचे आहे.

Mega Recruitment! 12 lakh openings in IT sector in next one and half years
Indian Railway Recruitment 2021: महिना 60 हजार रुपयांच्या नोकरीची सुवर्णसंधी

“आयटी सर्व्हिसेस कंपन्यांनी आपले जुने प्रोजेक्ट जवळपास संपवले आहेत आणि नवीन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग लागणार आहे मात्र सध्या पुरेसे लोक नाहीत,” एक्सफेनो या स्टाफिंग सोल्यूशन्स कंपनीचे म्हणणे आहे.

मागील दीड वर्षांपासून भारतसह जगात कोरोनाने थैमान घातले आहे आणि याकाळात अनेक व्यापार डिजिटल प्लॅटफॉर्मवर आले आणि याचाच फायदा म्हणजे भारतातील पहिल्या चार आयटी कंपन्यांना एमएनसीकडून मोठे प्रोजेक्ट मिळाले.या कंपन्यांनी अनेक एमएनसी कंपन्यांबरोबर महत्वाचे करार केले आणि याचमुळे या कंपन्यांमध्ये अनेक संध्या उपलब्ध झाल्या आहेत.

Mega Recruitment! 12 lakh openings in IT sector in next one and half years
अदानी ग्रुपवर चौकशीची टांगती तलवार

मागील अनेक दिवसांपासून आयटी क्षेत्रालाही कोरोना महामारीचा फटका बसला आणि बऱ्याच जणांच्या नोकऱ्याही गेल्या अशातच आता आणखीन बऱ्याच संधी उपलध होतील अशी महती तद्यांकडून मिळत आहे. पण दुसरीकडे मात्र जे अनुभवी लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात आपला वेतन वाढवून मागतात आणि अशातच कंपन्यांना फ्रेशर्सला संधी द्यायला आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखेच आहे.

तर या जून तिमाहीचा विचार करता या 4 मोठ्या कंपन्यांनी जवळपास 48,500 लोकांना संधी दिली आहे.टीसीएस या भारतातील सर्वात मोठी आयटी सर्व्हिसेस कंपनीने जून तिमाहीत एकूण 20,400 जणांना नॊकरीची संधी दिली आहे. तर इन्फोसिसने 8,200 विप्रोने 12,000 तर एचसीएल टेक्नॉलॉजीजने जूनच्या तिमाहीत 7,500 नवीन लोकांना संधी दिली आहे.

नवीन ओपनिंगचा विचार करता एचसीएल टेक्नॉलॉजीजने काल एक अहवाल दिला आहे ज्यात असे सांगण्यात आले आहे की, मागील वर्षाच्या 14,000 च्या तुलनेत यावर्षी 22,000 फ्रेशर आम्ही भरती करणार आहोत.कंपनीचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी व्ही.व्ही. अप्पा राव म्हणाले की, गेल्या दोन तिमाहीत 16,800 पेक्षा जास्त कर्मचारी जोडले गेले आहेत तर मागील तिमाहीत अतिरिक्त 3,000 थर्ड पार्टी कंत्राटदार जोडले गेले आहेत.

या क्षेत्रामध्ये अनेक ओपनिंग तर निघतच आहेत तसेच या कंपन्यांचा दुसरा भाग विचार करता अनेक जुने कर्मचारी ज्यांना मोठा अनुभव आला आहे असे कर्मचारीही बऱ्याच प्रमाणात कपंनी सोडून जात आहेत आणि नेमकी हीच तफावत भरून काढण्यासाठीही मोठ्या प्रमाणात भरती निघण्याचे हे ही एक कारण मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com