Bar Codes on Medicines: औषधांच्या पाकिटावर क्यूआर कोड होणार अनिवार्य! केंद्राचा मोठा निर्णय

Bar Codes On Medicines: आता औषधांचाही आधारकार्ड निघणार आहे.
Bar Codes on Medicines| India
Bar Codes on Medicines| IndiaDainik Gomantak

पुढील वर्षांपासून केंद्र सरकारकडून औषधांवर बारकोड लावणे अनिवार्य होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. देशात विक्री होणाऱ्या औषधांच्या पाकिटांवर बारकोड अनिवार्य करण्यासाठी केंद्र सरकारने मागील वर्षी Drugs and Cosmetic Rules, 1945 कायद्यात दुरुस्ती करत त्यात अनुसूची एच2 जोडली. या निर्णयामुळे उत्पादन आणि वितरण साखळीच्या माध्यमातून औषधांची सत्यता पडताळता येणे शक्य होणार आहे. यातून बनावट औषधांना आळा बसणार असल्याचे म्हटले जात आहे.

पुढील वर्षी 1 ऑगस्ट 2023 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयाला 'औषधांचा आधारकार्ड' असे म्हटले जाणार आहे. या युनिक क्यूआर कोडमध्ये औषधाबाबतची सर्व माहिती असणार आहे. यामध्ये उत्पादनाचे आयडेंडिटीफिकेशन कोड, औषधाचे नाव आणि जेनेरिक नाव, ब्रॅण्डचे नाव, उत्पादकाचे नाव आणि पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, औषधाची मुदत, उत्पादकाचा परवाना क्रमांक यासारखी माहिती मिळणार आहे.  

Bar Codes on Medicines| India
Old Pension Scheme: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, जुन्या पेन्शन योजनेबाबत...

केंद्र सरकारकडून या नव्या निर्णयाची माहिती देण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी देशभरातील केमिस्ट आउटलेटवर प्रचार केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले आहे.

भारतात अॅलेग्रा, डोलो, ऑगमेंटिन, सॅरिडॉन, कॅल्पोल आणि थायरोनॉर्म यांसारख्या औषधांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. या औषधांसह जवळपास 300 औषधे बारकोडसह मार्केटमध्ये दाखल होणार आहेत. सध्या, पहिल्या टप्प्यात 300 औषधे बारकोडसह येणार आहेत. या 300 औषधांचा भारतीय मार्केटमधील वाटा 35 टक्क्यांच्या घरात आहे. त्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत इतर सर्व औषधांवर क्यूआर कोड (Q-R Code) असणार आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com