Maruti Suzuki Baleno: मारूती-सुझुकीने तब्बल 7213 बॅलेनो कार मागे बोलावल्या; जाणून घ्या नेमके कारण...

ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही
Maruti Suzuki Baleno RS
Maruti Suzuki Baleno RSDainik Gomantak
Published on
Updated on

Maruti Suzuki Baleno: मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने सदोष व्हॅक्यूम पंपमुळे ७,२१३ बॅलेनो कार्स परत मागवल्या आहेत. यात 27 ऑक्टोबर 2016 ते 1 नोव्हेंबर 2019 या काळातील उत्पादित प्रीमियम हॅचबॅकच्या RS प्रकाराचा समावेश आहे. मारुती सुझुकीने एका नियामक फायलिंगमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

एक्स्चेंज फाइलिंगनुसार, या वाहनांच्या व्हॅक्यूम पंपमध्ये बिघाड झाल्यामुळे ब्रेक पेडलमध्ये समस्या निर्माण झाली आहे. मारुती सुझुकीच्या अधिकृत वर्कशॉप्स मॉडेलच्या मालकांशी संपर्क साधतील जेथे दोष दूर केला जाईल.

सदोष भाग बदलण्यासाठी वाहनधारकांना कळवण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे. दोष दुरुस्त करण्यासाठी किंवा भाग बदलण्यासाठी ग्राहकाकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कंपनीने जानेवारी 2020 पासून बॅलेनो आरएस मॉडेल बंद केले आहे.

Maruti Suzuki Baleno RS
Google Lay off: गुगलमध्ये एकीकडे 12,000 कर्मचाऱ्यांची कपात; तर दुसरीकडे CEO ना तब्बल 'इतका' पगार

व्हॅक्यूम पंप कसा काम करतो?

कारमधील व्हॅक्यूम पंप ब्रेक फंक्शनला मदत करतो. ज्या वाहनांना व्हॅक्यूम पंपाची समस्या भेडसावत आहे. ज्या कारमध्ये ब्रेक करण्यासाठी ब्रेक पेडलवर अधिक दाब द्यावा लागतो, अशा गाड्यांना अपघाताचा धोका असल्याने गाड्या परत मागवल्या आहेत.

मारुती सुझुकीने यापूर्वी 24 जानेवारी रोजी ग्रँड विटाराच्या 11,177 युनिट्स परत मागवल्या होत्या. मागील सीटच्या सीट बेल्ट माउंटिंग ब्रॅकेटमध्ये तांत्रिक दोष आढळल्याने कंपनीने 8 ऑगस्ट 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 दरम्यान उत्पादित केलेली SUV कार्स परत मागवल्या होत्या.

Maruti Suzuki Baleno RS
Indian Railways: करोडो रेल्वे प्रवाशांना अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी भेट, ट्रेनमध्ये मोफत मिळणार...

तर 18 जानेवारी 2023 रोजी कंपनीने 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान उत्पादित केलेली 17,362 वाहने परत मागवली होती. यामध्ये Alto K10, S-Presso, Eeco, Brezza Grand Vitara आणि Baleno या कार्सचा समावेश होता. या वाहनांच्या एअरबॅग कंट्रोलर्समध्ये बिघाड होता.

कंपनीने 2 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान उत्पादित एकूण 9,125 वाहने परत मागवली होती. या मॉडेल्समध्ये Ciaz, Brezza, Ertiga, XL6 आणि Grand Vitara यांचा समावेश होता. सदोष भाग बदलण्यासाठी कंपनीने ही वाहने परत बोलावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com