
भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकीच्या ग्रँड विटाराचा जलवा पाहायला मिळत आहे. भारतीय कारप्रेमींना या शानदार कारने मोहिनी घातली आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने घोषणा केली की, त्यांनी भारतात ग्रँड विटाराच्या 3 लाखांहून अधिक युनिट्स विकल्या. ही कामगिरी अवघ्या 32 महिन्यांत साधल्याचे कंपनीने सांगितले. हा एसयूव्ही सेगमेंटमधील मोठा रेकॉर्ड असल्याचे देखील कंपनीने सांगितले.
आर्थिक वर्ष 24-25 मध्ये ग्रँड विटाराच्या मजबूत हायब्रिड व्हेरिएंटची विक्री 43 टक्क्यांनी वाढली. ही एसयूव्ही माइल्ड-हायब्रिड इंजिनसह देखील उपलब्ध आहे. कंपनीने अलीकडेच ग्रँड विटारा भारतात लॉन्च केली. या एसयूव्हीमध्ये 6 एअरबॅग्ज आहेत.
दरम्यान, ग्राहकांना आता अलीकडेच सादर केलेल्या झेटा (ओ), अल्फा (ओ), झेटा+ (ओ) आणि अल्फा+ (ओ) व्हेरिएंट तसेच झेटा आणि अल्फा व्हेरिएंटमध्ये सनरुफ निवडण्याचा ऑप्शन आहे. याशिवाय, मारुतीने अनेक नवीन फीचर्स देखील जोडले आहेत. यामध्ये 8-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, 6एटी व्हेरिएंटसाठी इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, पीएम 2.5 डिस्प्लेसह ऑटो प्युरिफाय, नवीन एलईडी केबिन लाईट्स आणि रियर डोर सनशेड यांचा समावेश आहे. तसेच, नवीन डिझाइन केलेले कट फिनिश असलेले 17-इंच अलॉय व्हील्स देखील उपलब्ध आहेत.
मारुती सुझुकीची ग्रँड विटारा ही भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध असलेली प्रीमियम मिड-साईज एसयूव्ही आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक हायब्रिड टेक्नॉलॉजी आणि शानदार फीचर्स देण्यात आले आहे. मारुती ग्रँड विटारा आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर या सेगमेंटमधील एकमेव एसयूव्ही आहेत, ज्या ऑल-व्हील ड्राइव्ह पॉवरट्रेनसह येतात. ग्रँड विटारा ही या सेगमेंटमधील एकमेव एसयूव्ही आहे, जी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सुविधेसह ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टिम देते.
ग्रँड विटारा दोन इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. एक 1.5 लिटर स्मार्ट हायब्रिड पेट्रोल आणि दुसरा 1.5 लिटर इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड इंजिन आहे. कंपनीच्या मते, ग्रँड विटाराचे मायलेज 19.38 ते 27.97 किमी/ली दरम्यान आहे. ग्रँड विटाराच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, ती स्मार्ट प्ले प्रो + इन्फोटेनमेंट सिस्टिम, 22.86 सेमी टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह येते. तसेच, हेड-अप डिस्प्ले आणि वायरलेस चार्जिंग सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत.
सेफ्टीच्या बाबतीत, ग्रँड विटारामध्ये 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, हिल-होल्ड असिस्ट, हिल-डिसेंट कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सारखे अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. ग्रँड विटाराची एक्स-शोरुम किंमत 11.42 लाख पासून सुरु होऊन 20.68 लाखांपर्यंत जाते. ही स्मार्ट हायब्रिड आणि इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड या दोन्ही व्हेरिएंटसह 32 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.