Mahindra Scorpio-N
Mahindra Scorpio-NDainik Gomantak

Mahindra Scorpio: काय सांगता! तीस मिनिटात एक लाख 'स्कॉर्पिओ-एन' बुक

पहिल्या एका मिनिटात 25,000 बुकिंग झाल्याचा महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा दावा
Published on

भारतातील महिंद्रा आणि महिंद्रा (Mahindra & Mahindra) ही अॅटोमोबाईल क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीच्या अनेक टॉप गाड्या खासकरून एसयुव्ही मार्केटमध्ये आहेत. महिंद्राच्या गाड्यांना तरूणाईकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो, अशीच एक कार म्हणजे 'स्कॉर्पिओ'. कंपनीचे सध्या 'स्कॉर्पिओ-एन' (Scorpio-N) हे नवं मॉडेल बाजारात येत आहे. नेहमीप्रमाणे या गाडीची देखील मोठी चर्चा मार्केटमध्ये सुरू आहे. अशात कंपनीने केलेल्या एका दाव्याची सर्वत्र चर्चा आहे.

Mahindra Scorpio-N
पेडणेत युवक ठार; मालिका थांबेना!

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या 'स्कॉर्पिओ-एन' गाड्यांचे शनिवारी (30 जुलै) सकाळी अकरा बुकिंग सुरू झाले. बुकिंग सुरू झाल्यानंतर तीस मिनिटातच तब्बल एक लाख गाड्या बुक झाल्या. तर, पहिल्या मिनिटात 25,000 गाड्यांचे बुक झाल्या आहेत. असा दावा महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने केला आहे. नेटकऱ्यांनी मात्र कंपनीच्या या दाव्याचे खंडन केले आहे. एवढी विक्री शक्य नसल्याचे सोशल मिडियावर लोक व्यक्त होत आहेत. कंपनीकडून हाईप निर्माण केली जात आहे अशी टिका नेटकऱ्यांनी केली.

'स्कॉर्पिओ-एन' गाड्यांची डिलिव्हरी 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. डिसेंबर 2022 पर्यंत कंपनी 20 हजार गाड्यांची डिलिव्हरी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. बुकिंग (Scorpio-N Booking) केलेल्या ग्राहकांना गाडी डिलिव्हरीची तारिख ऑगस्ट 2022 च्या अखेर पर्यंत कळवली जाणार आहे. असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Mahindra Scorpio-N
गोवा सरकार ‘ॲक्शन मोड’वर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com