LIVE TV on Mobile : आता विना सबस्क्रिप्शन थेट मोबाईलवर पाहा LIVE TV; वाचा सविस्तर

LIVE TV on Mobile Without Subscription : वापरकर्ते इंटरनेटशिवाय थेट मोबाईलवर टीव्ही पाहू शकतील.
LIVE TV on Mobile Without Subscription
LIVE TV on Mobile Without SubscriptionDainik Gomantak
Published on
Updated on

LIVE TV on Mobile Without Subscription : सध्या तुम्हाला फोनवर थेट टीव्ही पाहण्यासाठी दोन प्रकारे खर्च करावा लागेल. एक ओटीटी सबस्क्रिप्शन आणि दुसरी इंटरनेट. पण येत्या काळात या दोन्ही खर्चातून तुमची सुटका होऊ शकते. यासाठी सरकार आता मोठ्या योजनेवर काम करत आहे. सरकार अशा तंत्रज्ञानाचा शोध घेत आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते इंटरनेटशिवाय थेट मोबाईलवर टीव्ही पाहू शकतील. (LIVE TV on Mobile Without Subscription)

LIVE TV on Mobile Without Subscription
Nose Picking : तुम्हाला पण नाकात बोटं घालायची सवय आहे का? मग सावधान! अल्झायमरचा होऊ शकतो धोका

या तंत्रज्ञानाचे नाव डायरेक्ट 2 मोबाईल असे आहे, जे बरेचसे डायरेक्ट टूम होमसारखे आहे. सरकार या तंत्रज्ञानाचा वापर फेक न्यूज, आपत्कालीन सूचना आणि नैसर्गिक आपत्ती टाळण्यासह इतर वेळी करू शकते.

दूरसंचार विभाग यावर अभ्यास करत असून, स्पेक्ट्रम बँडच्या मदतीने ब्रॉडकास्ट सेवा थेट वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनपर्यंत पोहोचवली जाऊ शकते. सप्टेंबरमध्ये, IIT कानपूरने प्रसार भारतीच्या सहकार्याने D2M तंत्रज्ञानावर काम सुरू केले. मात्र, हे तंत्रज्ञान वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास थोडा वेळ लागेल. हे तंत्रज्ञान काय आहे आणि ते कसे कार्य करते ते जाणून घेऊया.

डायरेक्ट 2 मोबाईल तंत्रज्ञान काय आहे?

सध्या D2M वर काम सुरू आहे आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तीन ते चार वर्षे लागू शकतात. हे तंत्रज्ञान एफएम रेडिओच्या संकल्पनेवर पूर्णपणे कार्य करते, जे रिसीव्हरच्या मदतीने रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये प्रवेश करते.

OTT प्लॅटफॉर्म D2M तंत्रज्ञान देखील वापरू शकतात. सध्या प्रसार भारती या चाचणीसाठी 526-582 मेगाहर्ट्झ बँड वापरत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरकर्ते इंटरनेटशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकतील. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे तंत्रज्ञान पूर्वी दूरदर्शनच्या वाहिनीवर प्रसारित होते त्याच पद्धतीने कार्य करेल. जरी, त्यावेळी रिसीव्हर वापरावा लागत होता, परंतु येत्या काळात हा रिसीव्हर फक्त तुमच्या फोनमध्ये असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com