Low Budget Cars In India: कार घ्यायची आहे पण, बजेट कमी आहे? मग 'या' पाच कार तुमच्यासाठी आहेत

कार घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते पण, वाढती महागाई आणि कारचे वाढलेले भाव यामुळे सामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहे.
Low Budget Cars In India
Low Budget Cars In IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

भारतात कार घ्यायची झाली किंवा भाजी घ्यायची झाली तरी बजेटचा विचार केला जातो. देशात मिडल क्लास फॅमिलीची संख्या अधिक आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीबाबत बजेटचा विचार करण्याची सवय आहे. कार घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते पण, वाढती महागाई आणि कारचे वाढलेले भाव यामुळे सामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहे. पण, काही लो बजेट कार देखील आहेत. ज्याचा सामान्य माणूस खरेदी करू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत अशा कार? (Low Budget Cars In India)

Low Budget Cars In India
Jayanti Chauhan & Bisleri: 7,000 कोटींची बिस्लेरी चालवण्यास जयंती चौहान यांनी नकार का दिला? पाच मुद्दे

Maruti Suzuki Alto 800: या लिस्टमध्ये सर्वात पहिली कार आहे, मारूती सुझुकी अल्टो 800. अल्टो 3.39 लाख रुपयांपासून उपलब्ध आहे. अल्टो 800 cc इंजिनसह 47.3 bhp आणि 63 Nm पीक टॉर्क देते. कार 22.5 kmpl मायलेज देते.

Maruti Suzuki Alto K10: मारूती सुझुकी अल्टो K10 देखील मायलेजच्या बाबतीत मजबूत कार आहे. अल्टो K10 24.39 kmpl मायलेज देते. या कारची सुरवातीची किंमत 3.99 लाख रूपये आहे.

Maruti S-Presso: त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे मारूती एस-प्रेसो, ही कार 4.25 लाख रूपये किंमत उपलब्ध आहे. या कारचे आणि अल्टो K10 कारचे इंजिने एकसारखेच आहे.

Low Budget Cars In India
Sambhaji Chhatrapati:...तर उठाव होणारच, संभाजीराजेंनी दिला राज्यपाल हटाओचा नारा

Renault Kwid: रेनो क्विड कार 4.64 लाख रूपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. मारूती सुझुकी अल्टो आणि क्विड कार एकमेकांचे स्पर्धेक आहेत. दोन्ही कारला 800 cc इंजिन आहे. 2015 पासून ही कार भारतीय बाजारात आहे.

Maruti Suzuki Celerio: मारूती सुझुकी सेलेरिओ ही थोडी महागडी आणि तिची किंमत पाच लाखांच्या पुढे आहे. सेलेरिओ LXI 5.25 लाख रूपयांमध्ये उपलब्ध आहे.

लो बजेटमधील कारचा जर तुम्ही विचार करत असाल तर, वरील सर्व पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. दरम्यान, कारच्या मूळ किंमतीत थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com