LIC
LICDainik Gomantak

LIC Share Price: गुंतवणूकदारांना लागली लॉटरी, एलआयसीचे शेअर्स बनले रॉकेट!

LIC Share Price: तुमच्याकडेही LIC चा शेअर असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. काल कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत.
Published on

LIC Share Price: तुमच्याकडेही LIC चा शेअर असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. काल कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

यावेळी एलआयसीचा नफा 14 पटीने वाढला असून, त्यानंतर गुंतवणूकदारांनाही लॉटरी लागली आहे. आज कंपनीचे शेअर्स खरेदीसाठी गर्दी झाली. एलआयसीचा शेअर आज 6 टक्क्यांनी वाढून 679.95 च्या पातळीवर पोहोचला.

नफ्यामुळे स्टॉक वाढला

दरम्यान, पहिल्या तिमाहीत कंपनीने केलेल्या मजबूत नफ्यामुळे एलआयसीच्या (LIC) शेअर्समध्ये वाढ झाली आहे. आज कंपनीच्या शेअर्सची चांगली खरेदी झाली.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय आयुर्विमा महामंडळाचा निव्वळ नफा अनेक पटींनी वाढून 9,544 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

LIC
MRF Share Price: एमआरएफ ने रचला इतिहास! एक लाखांची किंमत पार करणारा भारतातील एकमेव शेअर

कंपनीचे उत्पन्न किती होते?

सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीने गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 683 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

एलआयसीने शेअर बाजाराला (Stock Market) सांगितले की, जून तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून रु. 1,88,749 कोटी झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 1,68,881 कोटी होते.

LIC
SBI Share Price: SBI ने दिली आनंदाची बातमी, कमाईच्या बाबतीत 'चांदी'!

प्रीमियम किती कमी केला?

पहिल्या वर्षाचा प्रीमियम जून 2022 च्या तिमाहीत 7,429 कोटी रुपयांवरुन जून तिमाहीत 6,811 कोटी रुपयांवर घसरला. विमा कंपनीने जून तिमाहीत रु. 53,638 कोटी कमावले, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 50,258 कोटी होते.

3 महिन्यांत स्टॉक 21 टक्क्यांनी वाढला

गेल्या 3 महिन्यांत एलआयसीच्या शेअर्सने वेग पकडला आहे. गेल्या 3 महिन्यांत कंपनीचा स्टॉक 21 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 9 मे रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 557 च्या पातळीवर होती. त्याचवेळी, 11 ऑगस्ट रोजी कंपनीचा स्टॉक 679 च्या पातळीवर पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com