Performance Of LIC in Share Market: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीची लिस्टिंग होऊन एक वर्ष झाले आहे. आणि अशात गेल्या तिमाहीचे निकाल उत्कृष्ट आहेत.
मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा (LIC Profit) जवळपास पाच पटीने वाढला आहे. मात्र, कमाईच्या बाबतीत कंपनीचे नुकसान झाले आहे आणि एलआयसीच्या निव्वळ उत्पन्नात घट नोंदवली गेली आहे.
गेल्या वर्षी 17 मे 2022 रोजी शेअर बाजारात लिस्टिंग झालेल्या LIC चा नफा 2022-23 आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 13428 कोटी रुपये आहे.
एलआयसीने जाहीर केलेल्या इतर आकडेवारीवर नजर टाकल्यास, कंपनीचे निव्वळ उत्पन्न 8 टक्क्यांनी घटून 1.31 लाख कोटी रुपये झाले आहे.
एका वर्षापूर्वी ते 1.43 लाख कोटी रुपये होते. संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 साठी LIC चा निव्वळ नफा 35,997 कोटी रुपये झाला आहे, जो 2021-22 मध्ये फक्त 4,125 कोटी रुपये होता.
चौथ्या तिमाहीतील जबरदस्त निकालामुळे कंपनीने प्रति शेअर ३ रुपये डिव्हिडंड जाहीर केला आहे. LIC ने देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आणला होता.
याद्वारे बाजारातून 21,000 कोटी रुपये जमा केले होते. स्टॉक मार्केटमध्ये त्याची लिस्टिंग खराब होती. त्यामुळे गेल्या एका वर्षापासून गुंतवणुकदार 35 टक्के तोट्यात आहेत.
लिस्टिंग झाल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे आणि यामुळे कंपनीचे बाजार भांडवल (LIC MCap) एका वर्षात सुमारे 2 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. चौथ्या तिमाहीत नफा वाढण्यामागे कंपनीच्या गुंतवणूक उत्पन्नाचा मोठा हात आहे.
जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान, LIC ने गुंतवणुकीतून परतावा म्हणून 67,846 कोटी रुपये कमावले आहेत. या कालावधीत कंपनीचे निव्वळ कमिशन 5 टक्क्यांनी वाढून 8,428 कोटी रुपये झाले आहे.
एलआयसीचा Q4 Result जाहीर झाल्यानंतर त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून येत आहे. गुरुवारी शेअर बाजार उघडल्यानंतर एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे.
सकाळी 11.30 वाजेपर्यंत एलआयसी शेअर 1.41 टक्क्यांच्या वाढीसह 602.25 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.
बुधवारी एलआयसीचा शेअर बीएसईवर 0.61 टक्क्यांच्या वाढीसह 593.55 रुपयांवर बंद झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.