Pension Plan: LIC ने लाँच केली नवी पेन्शन योजना, वाचा सविस्तर एका क्लिकवर
आपण सर्वजण आपल्या रिटायर्डमेंट चिंता करतो. लोकांची ही चिंता लक्षात घेता भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ने नवी पेन्शन योजना सुरू केली आहे. एलआयसीने 5 सप्टेंबर रोजी नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे. ही एक नॉन पार्टिसिपेटिंग, युनिट लिंक्ड इंडिविजुअल पेन्शन योजना आहे. या योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया-
एलआयसीच्या या पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवणूकदार सिंगल प्रीमियम किंवा नियमित प्रीमियमद्वारे गुंतवणूक करू शकतात. किमान एक लाख रुपये सिंगल प्रीमियममध्ये आणि नियमित प्रीमियममध्ये दरमहा 3000 रुपये जमा करावे लागतील. या पेन्शन प्लॅनमध्ये LIC ने कोणतीही वरची मर्यादा ठेवली नाही. गुंतवणूकदार त्यांच्या आवडीनुसार कमाल मर्यादा निवडू शकतात. गुंतवणूकदाराला काही अटींच्या अधीन राहून ठेव कालावधी काढण्याचा किंवा वाढवण्याचा पर्याय असेल.
पॉलिसी होल्डर्स 5 वर्षानंतरच या योजनेतून पैसे काढू शकणार आहे. म्हणजेच, तुम्ही एकदा पैसे गुंतवायला सुरुवात केली की तुमचे पैसे 5 वर्षांसाठी लॉक केले जातील. LIC कडून 105 टक्के खात्रीशीर मृत्यू दावा उपलब्ध आहे. एनआरआय या योजनेत गुंतवणूक करू शकतात.या योजनेत गुंतवणूक करण्याचे किमान वय 25 वर्षे असावे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.