
कमी बजेटमध्ये 5G सपोर्ट असलेला स्मार्टफोन शोधत असलेल्या ग्राहकांसाठी लावा कंपनीने आपला नवीनतम Lava Bold N1 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. Android 15 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा हा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो आणि बजेट स्मार्टफोन प्रेमींमध्ये याला विशेष आकर्षण मिळत आहे.
Lava Bold N1 5G दोन वर्षांसाठी Android अपडेट्स आणि तीन वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्ससह येतो. याशिवाय, या फोनमध्ये ८ जीबी रॅमचा अनुभव व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने घेता येईल, जे बजेट श्रेणीत हा फोन इतर स्पर्धकांपेक्षा वेगळा बनवते.
या Lava स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत:
4GB RAM / 64GB स्टोरेज: 7,499 रुपये
4GB RAM / 128GB स्टोरेज: 7,999 रुपये
फोनची विक्री Amazon Great Indian Festival 2025 सेलपासून सुरू होईल, त्यामुळे ग्राहकांना हा फोन खरेदी करण्याची उत्तम संधी मिळेल.
Lava Bold N1 5G पोको C75 5G, सॅमसंग गॅलेक्सी F06 5G आणि रेडमी A4 5G सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करेल. या सर्व ५जी स्मार्टफोनची किंमत १०,००० रुपयांपेक्षा कमी आहे, ज्यामुळे बजेट स्मार्टफोन खरेदीदारांसाठी ही श्रेणी खूपच आकर्षक ठरली आहे.
Lava Bold N1 5G स्पेसिफिकेशन
स्क्रीन: 6.75 इंचाचा HD+ LCD स्क्रीन, 90Hz रिफ्रेश रेटसह, ड्युअल सिम सपोर्ट.
चिपसेट: ऑक्टा-कोर Yunisoc T765 प्रोसेसर.
रॅम आणि स्टोरेज: 4GB रॅम + 4GB व्हर्च्युअल रॅम (एकूण 8GB अनुभव), 64GB / 128GB स्टोरेज, मायक्रोएसडी कार्डसह 1TB पर्यंत वाढवता येईल.
कॅमेरा: मागील बाजूस 13MP AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, समोर 5MP सेल्फी कॅमेरा, मागील कॅमेरा 4K/30fps व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
कनेक्टिव्हिटी: ब्लूटूथ 4.2, Wi-Fi, USB Type-C, OTG सपोर्ट.
बॅटरी: 5000mAh बॅटरी 18W फास्ट चार्ज सपोर्टसह
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.