अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप स्वस्तात मिळवण्याची आज शेवटची संधी

ही सेवा नेटप्लिक्स (Netflix) पेक्षा स्वस्त असली तरी. पण आजपासून त्याची किंमत वाढणार आहे.
Last chance to get cheap Amazon Prime Membership
Last chance to get cheap Amazon Prime Membership Dainik Gomantak
Published on
Updated on

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप त्याच्या स्वतःच्या अनेक फायद्यांसह येते, ज्यामध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंगसह, वापरकर्ते जलद वितरण, प्रथम विक्रीचा प्रवेश आणि प्राइम म्युझिकचा आनंद घेऊ शकतात. ही सेवा नेटप्लिक्स (Netflix) पेक्षा स्वस्त असली तरी. पण आजपासून त्याची किंमत वाढणार आहे आणि जर तुम्ही ही सेवा वापरत असाल तर ती स्वस्तात मिळवण्याची आज शेवटची संधी आहे. 13 डिसेंबरच्या रात्रीपासून त्याची किंमत वाढणार आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइमच्या (Amazon Prime) वार्षिक सदस्यत्वाची किंमत 999 रुपये आहे, पण उद्यापासून म्हणजेच 14 डिसेंबरपासून ती 1,499 रुपये होणार आहे. याचा अर्थ असा की आज रात्रीपर्यंत ग्राहक जुन्या किमतींवर (म्हणजे वार्षिक 999 रुपये) त्यांच्या सदस्यत्वाचा लाभ घेऊ शकतील. वार्षिक सभासदत्वात 500 रुपयांची वाढ होणार आहे. ज्यांनी आधीच योजना खरेदी केली आहे त्यांच्यावर या वाढलेल्या किमतींचा कोणताही परिणाम होणार नाही.

Last chance to get cheap Amazon Prime Membership
जास्ती रिटर्न्स हवंय? मात्र RBI चा इशारा

तीन महिन्यांचा प्लॅन आता 329 रुपयांना खरेदी करता येईल, तर 14 डिसेंबरपासून त्याची किंमत 459 रुपये असेल. त्याच वेळी, एका महिन्याच्या प्लॅनसाठी, आत्तापर्यंत वापरकर्त्यांना फक्त 129 रुपये द्यावे लागतील, तर उद्यापासून 179 रुपये द्यावे लागतील.

अ‍ॅमेझॉन (Amazon) प्राइम मेंबरशिपचा फायदा असा आहे की यात केवळ व्हिडिओ स्ट्रीमिंगचा फायदा मिळत नाही, तर वापरकर्त्यांना लवकर ऍक्सेस सेलचा पर्याय मिळतो. यासोबतच अॅमेझॉन म्युझिकमध्ये प्रवेश देखील उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने 7 कोटीहून अधिक गाण्यांचा आनंद घेता येईल.

अ‍ॅमेझॉन प्राइमशी स्पर्धा करण्यासाठी, डिज्नी प्लस हॉट स्टार (Disney+ Hotstar) ने अलीकडेच नवीन प्लॅन सादर केले आहेत, ज्यांची सुरुवातीची किंमत रु 499 आहे. या योजनांद्वारे तुम्ही नवीन चित्रपट, नवीनतम मालिका आणि वेब सीरिज पाहू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com