SBI निवृत्तीवेतनधारकांसाठी गुड न्यूज

तुम्ही तुमचे 'लाईफ सर्टिफिकेट' (VideoLifeCertificate) आता व्हिडिओ कॉलद्वारे सादर करा, कसे ते जाणून घ्या...
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पहिली 'व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट' (VideoLifeCertificate) सेवा सुरू केली आहे.
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पहिली 'व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट' (VideoLifeCertificate) सेवा सुरू केली आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) देशातील पहिली 'व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट' (VideoLifeCertificate) सेवा सुरू केली आहे. SBI पेन्शनधारकांसाठी ही सेवा देशभरात उपलब्ध आहे. ते आता साध्या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. जी पेन्शनधारकांना (Pensioner) दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. जर निवृत्ती वेतन मिळणे सुरू ठेवायचे असल्यास ते अनिवार्य आहे. सहसा, हे करण्यासाठी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यानची मुदत असते. त्यामुळे, पेन्शनधारकांना त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक महिना मिळतो. पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभाग 80 वर्षांवरील व्यक्तींना 1 ऑक्टोबरपासून त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची परवानगी देतो.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पहिली 'व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट' (VideoLifeCertificate) सेवा सुरू केली आहे.
SBI ने बॉण्ड विकून उभे केले 6 हजार कोटी रुपये

"आता तुमचे #LifeCertificate तुमच्या घरबसुन आरामात सबमिट करा! कारण SBI ने आता #VideoLifeCertificate सेवा निवृत्तीवेतनधारकांसाठी सुरु केली आहे. यात तुम्हाला तुमचे जीवन प्रमाणपत्र एका साध्या व्हिडिओ कॉलद्वारे बँकेत सबमिट करता येऊ शकते. असे देशातील सर्वात मोठ्या बँकेने ट्विटमकरत म्हटले आहे.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पहिली 'व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट' (VideoLifeCertificate) सेवा सुरू केली आहे.
SBI बँकेचा ग्राहकांसाठी दिवाळी धमाका, 12315 घरांचा स्वस्तात लिलाव

SBI पेन्शनधारक व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे जीवन प्रमाणपत्र पुढीलप्रमाणे सादर करू शकतात:

1: SBI पेन्शन सेवा वेबसाइटला भेट द्या, जी नुकतीच सुधारित करण्यात आली आहे (https://www.pensionseva.sbi/).

2: व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट (VLC) प्रक्रिया सुरू करण्यासाठी, पेन्शनधारकांनी 'व्हिडिओ एलसी' वर क्लिक करणे आवश्यक आहे.

3: तुमचा SBI पेन्शन खाते क्रमांक टाईप करुन ऐंन्टर करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला OTP टाका.

4: 'टर्म्स आणि कंडिशन' वाचा आणि स्वीकारा त्यानंतर 'स्टार्ट जर्नी' वर क्लिक करा.

5: 'मी तयार आहे' वर क्लिक करण्यापूर्वी तुमचे पॅन कार्ड तुमच्याकडे ठेवा.

6: तुमचा व्हिडिओ संवाद सुरू करण्यासाठी परवानगी द्या. एकतर तुम्ही SBI अधिकारी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करू शकता किंवा तुमच्या सोयीच्या वेळी कॉल शेड्यूल करू शकता.

7: एकदा कॉल सुरू झाल्यावर, पेन्शनधारकाला तुमच्या स्क्रीनवरील 4 अंकी सत्यापन कोड वाचण्यास सांगितले जाईल.

8: नंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड दाखवण्यास सांगितले जाईल जेणेकरून SBI अधिकारी ते कॅप्चर करू शकतील.

9: SBI अधिकारी नंतर तुमचा फोटो कॅप्चर करेल आणि यासह, व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट प्रक्रिया पूर्ण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com