'या' शेअरने केले गुंतवणूकदारांना श्रीमंत, फक्त 12 दिवसांत पैसे दुप्पट

6 जानेवारी 2022 रोजी शेअर बीएसईवर 71.25 रुपयांवर बंद झाला, तर 22 जानेवारीला तो तब्बल 140.05 रुपयांच्या उच्चांक गाठला. या कालावधीत स्टॉकमध्ये झाली तब्बल 210 टक्क्यांनी वाढ.
Share Market
Share MarketDainik Gomantak
Published on
Updated on

2022 या नवीन वर्षाच्या च्या सुरुवातीपासूनच, मोठ्या प्रमाणात शेअर ने त्यांच्या भागधारकांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. त्यांपैकी बहुतेक शेअर कमी लिक्विडिटी असलेले X किंवा XT श्रेणीतील आहेत. KIFS फायनान्शिअल सर्व्हिसेस (KIFS Financial Services) हा असाच एक X श्रेणीचा शेअर(Share Market) आहे, ज्याने फक्त 12 सत्रांमध्ये भागधारकांचे पैसे दुप्पट केले आहेत.

6 जानेवारी 2022 रोजी शेअर बीएसईवर 71.25 रुपयांवर बंद झाला, तर 22 जानेवारीला तो तब्बल 140.05 रुपयांच्या उच्चांक गाठला हा 52 आठवड्यांतील मोठा उच्चांक होता. KIFSकंपनीच्या शेअरने भागधारकांचे पैसे केवळ 12 ट्रेडिंग सत्रात दुप्पट केले.

Share Market
विना इंटरनेट करा UPI पेमेंट

बीएसईने शेअर्सच्या किमतीत झालेल्या वाढीबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण मागवले आहे. याला कंपनीने स्पष्टीकरण दिले की, KIFS Financial Services Ltd ने सांगितले की, "स्टॉक एक्स्चेंजवरील किंमतीतील अस्थिरतेचा कंपनीने घेतलेल्या माहितीशी किंवा निर्णयाशी काहीही संबंध नाही." हा निव्वळ मार्केट ट्रेडिंगवरचा सट्टा आहे, ज्याचा कंपनी किंवा तिच्या प्रवर्तकांशी काहीही संबंध नाही. शेअरच्या किमतीत वाढ सट्टेबाजीमुळे झाली आहे.

स्टॉकमध्ये अप्पर सर्किट

सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी रोजी KIFS Financial Services Limited च्या स्टॉकमध्ये 5 टक्के अपर सर्किट आहे. BSE वर शेअर 4.99 टक्क्यांनी वाढून 140.05 रुपयांवर पोहोचला. या कंपनीचे शेअर्स 2021 मध्ये परतावा देऊ शकले नाहीत, मात्र 2021 च्या शेवट शेवट ते वेगवान होऊ लागले. 31 डिसेंबर 2021 रोजी, स्टॉक BSE वर 43.50 रुपयांवर बंद झाला, मात्र नवीन वर्षाची सुरुवात होताच शेअरमध्ये कमालीची वाढ झाली. गेल्या आठवड्यात पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये तो 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला गेला आहे.

Share Market
अरे वा! आता इंटरनेटशिवाय करा UPI पेमेंट; वापरा या सोप्या पद्धती

एका महिन्यात शेअर्स 250% नी वाढले

NBFC चा स्टॉक गेल्या एका आठवड्यात रु. 115.25 वरून 140.05 पर्यंत वाढला आहे, ज्यामुळे त्यांच्या भागधारकांना 21.50 टक्‍क्‍यांचा फायदा झाला आहे. गेल्या एका महिन्यात तो 39.95 रुपयांवरून 140.05 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत स्टॉकमध्ये 250 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मल्टीबॅगर स्टॉकने यावर्षी आपल्या भागधारकांना 210 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे (Company) मार्केट कॅप 151.51 कोटी रुपये झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com