11.49 लाखांची 'ही' 7 सीटर कार ठरली गेमचेंजर! कारप्रेमींना केले आकर्षित; कंपनीच्या विक्रीत मोठी वाढ

Kia Carens Clavis: किआ इंडियाने नुकतीच लॉन्च केलेली प्रीमियम 7 सीटर कार कॅरेन्स क्लॅव्हिस ही त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरत आहे. मे महिन्यात किआ मोटर्सच्या विक्रीत तब्बल 14.43 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
Kia Carens Clavis
Kia Carens ClavisDainik Gomantak
Published on
Updated on

किआ इंडियाने नुकतीच लॉन्च केलेली प्रीमियम 7 सीटर कार कॅरेन्स क्लॅव्हिस ही त्यांच्यासाठी गेमचेंजर ठरत आहे. मे महिन्यात किआ मोटर्सच्या विक्रीत तब्बल 14.43 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. मे 2025 मध्ये कंपनीने 22,315 वाहने विकली. कंपनीने सांगितले की, अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या किआ कॅरेन्स क्लॅव्हिसने कारप्रेमींना मोहिनी घातली. ही एमपीव्ही 11.49 लाख एक्स-शोरुम किमतीत लॉन्च करण्यात आली.

दरम्यान, किआचे पुढील प्रोडक्ट जुलैमध्ये लॉन्च होणार आहे. हे किआ कॅरेन्स क्लॅव्हिसचे इलेक्ट्रिक व्हर्जन असेल. किआने भारतात बनवलेली ही पहिली इलेक्ट्रिक कार असेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आगामी कारची डिझाईन देखील आकर्षक असेल. भारतीय कारप्रेमींच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ती खूप विचारपूर्वक डिझाईन केली जात आहे.

Kia Carens Clavis
Kia Carens Clavis: फॅमिलीसाठी परफेक्ट! कियाची 7 सीटर कार लाँच; जबरदस्त लूक, स्मार्ट फिचर्स आणि किंमतही कमी

इलेक्ट्रिक कारची डिझाईन खूपच आकर्षक असेल

आगामी किआ कॅरेन्स कॅरेन्स क्लॅव्हिस इलेक्ट्रिकची डिझाईन पेट्रोल-डिझेल मॉडेलसारखेच असेल. तथापि, इलेक्ट्रिक कारनुसार काही बदल निश्चितच दिसून येतील. इलेक्ट्रिक कार असल्याने त्यात किआ EV9 सारखी बंद ग्रिल असेल. तसेच, त्यात नवीन डिझाईन केलेले फ्रंट आणि रियर बंपर असतील, तर अलॉय व्हील्स देखील नवीन डिझाईनचे असतील. स्पायशॉटवरुन असे दिसून येते की, कारमध्ये अधिक ग्राउंड क्लीयरन्स असेल आणि त्यात नवीन सस्पेंशन सेटअप देखील असेल.

Kia Carens Clavis
Kia Motors: कियाच्या Sonet, Seltos आणि Carens चे डिझेलचे मॉडेल लॉन्च; किंमत, फिचर्स जाणून घ्या

शानदार फीचर्स

किया कॅरेन्स ईव्हीमध्ये अनेक शानदार फीचर्स असतील. कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असण्याची शक्यता असून मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमशी जोडलेली असेल. इतर फीचर्समध्ये एअर प्युरिफायर, 360 डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा, वायरलेस फोन चार्जर यांचा समावेश असेल. येणाऱ्या किया कॅरेन्स ईव्हीमध्ये ह्युंदाई क्रेटा ईव्ही सारखी रेंज पॉवर असू शकते. त्यात 45 किलोवॅट प्रति तास बॅटरी असू शकते. कॅरेन्स ईव्हीमध्ये फ्रंट एक्सल-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर मिळण्याची शक्यता आहे. किआने अद्याप ईव्हीबाबत कोणतेही स्पेसिफिकेशन तपशील उघड केलेले नाहीत. तथापि अशी अपेक्षा आहे की, कॅरेन्स ईव्ही एका चार्जवर चांगली रेंज देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com