Kia Carens Clavis: फॅमिलीसाठी परफेक्ट! कियाची 7 सीटर कार लाँच; जबरदस्त लूक, स्मार्ट फिचर्स आणि किंमतही कमी

Kia Carens Clavis Price And Features: दक्षिण कोरियन कार निर्माता कंपनी किया मोटर्सनं भारतात आपल्या लोकप्रिय MPV कार्सचा नवीन अवतार Kia Carens Clavis लाँच केला आहे.
Kia Carens Clavis
Kia Carens ClavisDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण कोरियन कार निर्माता कंपनी किया मोटर्सनं भारतात Kia Carens Clavis MPV लाँच केली आहे. या प्रीमियम MPV ची एक्स-शोरूम सुरुवातीची किंमत 11.50 लाख इतकी आहे. कंपनीनं ही गाडी बुक करण्याची प्रक्रिया 9 मे 2025 पासून सुरू केली आहे. ग्राहक कारेन्स क्लॅव्हिसचं बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच अधिकृत डीलरशिप्सवर करू शकतात.

नवीन किया कारेन्स क्लॅव्हिस ही आधीच्या कारेन्स मॉडेलची पुढची आवृत्ती असून, यात डिझाईन, इंटीरियर आणि टेक्नोलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे. ही MPV आकर्षक लुक, प्रीमियम इंटीरियर, आणि अनेक नवनवीन वैशिष्ट्यांसह कार बाजारात दाखल झाली आहे.

Kia Carens Clavis
Goa Rain: लाखोंचे आर्थिक नुकसान! मुसळधार पावसामुळे घरे-झाडांवर संक्रांत, वाहनांची हानी, वीज खात्यालाही मोठा फटका

कारेन्स क्लॅव्हिसचा स्पोर्टी लुक, एलईडी हेडलॅम्प्स, नव्या ग्रिल डिझाईनसह फ्रेश फ्रंट फेसिया, आणि स्टायलिश अलॉय व्हील्स यांचा समावेश आहे. यात दिलेल्या ड्युअल-टोन कलर स्कीम्स गाडीला अधिक आकर्षक बनवतात.

गाडीच्या इंटीरियरमध्ये ड्युअल-टोन थीम, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, तसेच व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टीपल USB चार्जिंग पोर्ट्स यांसारखी वैशिष्ट्यं देण्यात आली आहेत. याशिवाय, 6 आणि 7 सीट्स उपलब्ध आहे, त्यामुळं फॅमिलीसाठी हि कार परफेक्ट आहे.

Kia Carens Clavis
Goa BJP: काँग्रेस हा महाभयंकर दुष्ट पक्ष! CM सावंताचे सांताक्रुझ मेळाव्यात टीकास्त्र; 2027 मध्ये 27 आमदार आणण्याचा केला दावा

७ रंगांमध्ये उपलब्ध

कंपनीनं हि कार ८ रंगांमध्ये बाजारात आणली आहे. ज्यामध्ये आयव्हरी सिल्व्हर ग्लॉस, प्युटर ऑलिव्ह, इम्पीरियल ब्लू, ग्लेशियर व्हाइट पर्ल, ग्रॅव्हिटी ग्रे, स्पार्कलिंग सिल्व्हर, ऑरोरा ब्लॅक पर्ल आणि क्लिअर व्हाइट कलर यांचा समावेश आहे. अधिक प्रीमियम फील देण्यासाठी त्यात आयव्हरी सिल्व्हर ग्लॉस कलर आणण्यात आला आहे.

भारतीय बाजारपेठेत कारेन्स क्लॅव्हिसची टक्कर Maruti Suzuki XL6, Toyota Rumion, आणि Hyundai Alcazar यांसारख्या कार्सशी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com