केएफसी (KFC) आणि पिझ्झा हट (Pizza Hut) आउटलेट्स चालवणाऱ्या सॅफायर फूड्स इंडिया (Sapphire Foods) या कंपनीने 2,073 कोटी रुपयांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी (IPO) प्रति शेअर 1,120-1,180 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. या कंपनीचा IPO 9 नोव्हेंबरला सबस्क्रिप्शनसाठी बाजारात (Share Market) सुरू होणार आहे तर 11 नोव्हेंबरला बंद होईल. तर अँकर गुंतवणूकदारांची बोली 8 नोव्हेंबरला सुरू होईल. (KFC Pizza Hut IPO)
कंपनीचा येणार IPO हा 1,75,69,941 इक्विटी शेअर्सचा संपूर्णपणे प्रवर्तक आणि विद्यमान शेअर धारकांद्वारे विक्रीसाठी असेल. OFS अंतर्गत, QSR मॅनेजमेंट ट्रस्ट 8.50 लाख शेअर्स विकणार आहे, Sapphire Foods Mauritius Ltd 55.69 लाख शेअर्स विकेल, त्याचबरोबर WWD Ruby Ltd 48.46 लाख शेअर्स विकणार आहे आणि Amethyst 39.62 लाख शेअर्स विकेल अशी माहिती समोर येत आहे.
याशिवाय, AAJV इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ही कंपनी आपले 80,169 शेअर्स विकणार आहे, एडलवाईस क्रॉसओव्हर अपॉर्च्युनिटीज फंड 16.15 लाख शेअर्स आणि एडलवाईस क्रॉसओव्हर अपॉर्च्युनिटीज फंड-सीरीज II 6.46 लाख शेअर्स विकणार आहे.
प्राइस बँडच्या अंदाजानुसार कंपनीला IPO मधून जवळपास 2,073 कोटी रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीने या साऱ्या शेअर्सबद्दल अधिकृत माहिती देताना , कंपनीचे 75 टक्के शेअर्स हे पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी 15 टक्के गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी आणि उर्वरित 10 टक्के शेअर्स हे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
Sapphire Foods ही कंपनी एक ओमनी-चॅनल रेस्टॉरंट ऑपरेटर आणि भारतीय उपखंडातील यम ब्रँड्सची सर्वात मोठी फ्रँचायझी आहे . समारा कॅपिटल, गोल्डमन सॅक्स, सीएक्स पार्टनर्स आणि एडलवाईस सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांची गुंतवूणक Sapphire Foods या कंपनीत आहे. 31 मार्च 2021 पर्यंत, सॅफायर फूड्स या कंपनीचे भारत आणि मालदीवमध्ये 204 KFC रेस्टॉरंट्स तर भारत, श्रीलंका आणि मालदीवमध्ये 231 पिझ्झा हट रेस्टॉरंट्स आणि श्रीलंकेत दोन टॅको बेल रेस्टॉरंट्स आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.