Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलात नोकरीच्या शोधात भटकणाऱ्या तरुणांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. यासाठी, भारतीय नौदलाने नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट indiannavy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
(Job opportunity in Indian Navy without examination)
याशिवाय, उमेदवार https://indiannavy.nic.in/ या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10702_33_2223b.pdf या लिंकद्वारे, तुम्ही अधिकृत अधिसूचना देखील तपासू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 338 पदे भरली जातील.
भारतीय नौदल भरती 2022 साठी महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 जून 2022 सकाळी 10 वाजता
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 जुलै 2022
भारतीय नौदल भरती 2022 साठी रिक्त जागा तपशील
एकूण पदांची संख्या – 338
भारतीय नौदल भरती 2022 साठी पात्रता निकष
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10वी पास असावा. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये 65% गुणांसह ITI पास.
भारतीय नौदल भरती 2022 साठी वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा 01 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान असावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.