गेल्या दोन वर्षांत देशात आणि जगात आर्थिक संकट आले आहे. प्रथम कोरोना महामारी आणि आता रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक रोजगार संकट निर्माण झाले आहे. या काळात भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मंदीच्या वाढत्या धोक्यात, कंपन्या त्यांच्या कामगारांना कामावरून काढून टाकत आहेत. नोकरी नसताना घरखर्च, भाडे आणि ईएमआयचे टेन्शन येणे स्वाभाविक आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे (Family) संरक्षण करण्यासाठी जॉब इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकता. यामुळे नोकरी गमावल्यास, तुम्हाला विमा कंपनीकडून संरक्षणाचा लाभ मिळतो.
जॉब इन्शुरन्स कव्हर म्हणजे काय?
जॉब इन्शुरन्स (Job Insurance) हा जीवन विमा आणि आरोग्य विमा सारखाच आहे. यामध्ये, नोकरी गमावल्यास, पॉलिसीधारकाला विमा संरक्षणाचा लाभ मिळतो. सध्या, भारतातील (India) विमा कंपन्या स्वतंत्र नोकरी विमा संरक्षण देत नाहीत. तुम्ही जनरल इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्ससह काही वेगळे शुल्क भरून या विमा संरक्षणाचा लाभ घेऊ शकता.कंपनीच्या दिलेल्या मुदत आणि अटींमुळे तुम्ही नोकरी गमावल्यास, तुम्ही विमा दावा करून संरक्षण मिळवू शकता.
जॉब इन्शुरन्स कव्हरमध्ये मिणाऱ्या सुविधा
1. पॉलिसीधारकाने नोकरी गमावल्यास, विमा कंपनी त्याला विशिष्ट कालावधीसाठी आर्थिक मदत करते.
2. काही काळासाठी तुम्हाला घरखर्च चालवण्यासाठी दुसरा उत्पन्नाचा सोर्स मिळेल.
3. टर्म अँड कंडिशन नीट तपासून घ्या.
4. जर तुम्हाला भ्रष्टाचार किंवा कोणत्याही चुकीच्या कारणामुळे कंपनीतून काढून टाकण्यात आले असेल, तर तुम्हाला या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार नाही.
5. जे तात्पुरते नोकरी (Job) करतात त्यांना या विमा संरक्षणाचा लाभ मिळत नाही.
क्लेम कसा करावा?
जर तुमची अचानक नोकरी गेली असेल, तर तुम्ही तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व कागदपत्रांसह विमा कंपनीकडे दावा केला पाहिजे. यानंतर कंपनी या संपूर्ण दाव्याची पडताळणी करेल. यानंतर, सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्यानंतरच तुम्हाला हा दावा दिला जाईल. लक्षात ठेवा की ही विमा पॉलिसी तात्पुरती दिलासा आहे, परंतु कोणत्याही इनकमशिवाय (Income) , वाढत्या खर्चामध्ये ती तुम्हाला दिलासा देऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.