या IT कंपनीचे एकाच वर्षात शेअर गुंतवणूकदारांना150 टक्के रिटर्न्स

कंपनीचे सध्याचे बाजारातील एकूण भांडवल 53,700 कोटी रुपये इतके आहे. या कंपनीवर कर्जाचा बोझाही अगदी कमी आहे.
IT company Mphasis Limited stock price hike by 150% in one year
IT company Mphasis Limited stock price hike by 150% in one yearDainik Gomantak

मागील अनेक दिवसांपासून शेअर मार्केट (Stock Market) नवीन उच्चांक गाठताना दिसत आहे. सेन्सेक्स (Sensex) मधील शेअर्सचा विचार करता अनेक कंपन्या फायद्यातच दिसत आहेत.आयटी कंपन्यांचा (IT Company) विचार करता बाजारात आयटी क्षेत्राला सध्या शेअर्स मध्ये सर्वात जास्त मागणी आहे. कोरोना काळातही (COVID-19) गेल्या दीड वर्षात अनेक आयटी कंपन्यांच्या नफा कित्येक पटींनी वाढलेला पाहायला मिळत आहे .(IT company Mphasis Limited stock price hike by 150% in one year)

IT company Mphasis Limited stock price hike by 150% in one year
पाच बँकांची ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना , FD वर मिळणार भरघोस व्याज

आणि त्यामुळे आता बऱ्याच आयटी कंपन्यांच्या शेअर मध्ये पैसे गुंतवणाऱ्याना खूप जास्ती फायदा होताना दिसत आहे. आणि सध्याच्या मार्केटचा विचार करता मार्केटमधील एक कंपनी आपल्या ग्राहकांना मोठा नफा मिळवून देताना दिसत आहे. Mphasis Limited (MPHL) मागच्या फक्त एक वर्षाचा विचार करता कंपनीने गुंतवणुकदरांना तब्बल 150 टक्के रिटर्न्स दिले आहेत. गेल्यावर्षीचा विचार करता ऑगस्ट महिन्यात Mphasis Limited च्या एका शेअरची किंमत 1,198 रुपये इतकी होती. मात्र, वर्षभरानंतर म्हणजे 23 ऑगस्ट 2021 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत तब्ब्ल 3001.65 रुपये इतकी झाली होती . याचा अर्थ वर्षभरापूर्वी जर एखाद्याने या कंपनीचे पाच लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले असतील तर आता त्या शेअर्सची किंमत12.52 लाख रुपये इतकी झाली आहे.

कंपनीचे सध्याचे बाजारातील एकूण भांडवल 53,700 कोटी रुपये इतके आहे. या कंपनीवर कर्जाचा बोझाही अगदी कमी आहे. गेल्यावर्षी जून तिमाहीत कंपनीला 275.12 कोटींची निव्वळ नफा झाला होता. तर यावर्षी ऑगस्ट मध्येच कंपनीने 339.69 कोटींचा नफा कमावला आहे. त्यामुळे आगामी काळात टेक्निकल अॅनालिससनुसार Mphasis Limited कंपनीच्या शेअर्सचा भाव आणखीण वाढण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com