IRCTC Ticket Booking: आता बोलूनच तुमच्या ट्रेनचे तिकीट होणार बुक, IRCTC आणणार 'हे' नवे फीचर

जवळपास प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ट्रेनने प्रवास केला आहे.
IRCTC Ticket Booking:
IRCTC Ticket Booking:Dainik Gomantak
Published on
Updated on

IRCTC Ticket Booking: आजकाल अनेक लोक ट्रेनन प्रवास करतात. पूर्वीचा रेल्वे प्रवास आणि आताचा रेल्वे प्रवास यांच्यात खुप फरक आहे. बदलत्या काळानुसार रेल्वेनेही तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक गोष्टींमध्ये बदल केले आहे. हा ट्रेंड चालू ठेवत आयआरटीसी लवकरच एक नवीन फीचर आणणार आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही फक्त आवाजाच्या मदतीने तिकीट बुक करू शकतात.

IRCTC त्याच्या प्लॅटफॉर्मवर व्हॉइस आधारित तिकीट बुकिंग प्रक्रिया सुरू करू शकते. त्यामुळे ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे, नवीन वापरकर्ते देखील ते वापरू शकणार आहेत. यासाठी IRCTC आपल्या चॅटबॉट AskDisha मध्ये बदल करत आहे. 

आयआरसीटीसीने सांगितले की, व्हॉईस कमांडद्वारे तिकीट बुक करण्याची चाचणी सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली आहे. नवीन फायनान्समध्ये युजर्सना ही सुविधा मिळू शकते. ऑनलाइन तिकीट बुकिंगमध्ये IRCTC ची 82 टक्के भागीदारी आहे.

IRCTC Ticket Booking:
HDFC खातेधारकांसाठी मोठी अपडेट, डेटा लीक! बँकेचे म्हणणे आले समोर
  • आस्क दिशाचे वैशिष्ट्ये

प्रवासी आयआरसीटीसीच्या चॅटबॉट आस्क दिशा 2.0 च्या मदतीने तिकीट बुक करू शकतात. यासाठी ग्राहक टेक्स्ट किंवा व्हॉइस कमांड वापरू शकतात. ग्राहक आस्क दिशा 2.0 वर त्याचे तिकीट रद्द करू शकतात आणि रद्द केलेल्या तिकिटाची परतावा स्थिती तपासू शकतात.

यासोबतच यात पीएनआर स्टेटस देखील तपासता येणार आहे. तुम्ही ग्राहकांना ट्रेन प्रवासासाठी बोर्डिंग आणि गंतव्य स्थानक देखील बदलता येते.

  • हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न विचारू शकता

तुम्ही तुमचे प्रश्न IRCTC च्या चॅटबॉट Ask Disha 2.0 वर इंग्रजी आणि हिंदीमध्ये विचारू शकता. 'आस्क दिशा' हा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी IRCTC द्वारे डिझाइन केलेला एक विशेष कार्यक्रम आहे. तुम्हाला ते IRCTC च्या अधिकृत वेबसाइट irctc.co.in वर सहज मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com