IRCTC Hikes Food Price: तुम्हा जर रेल्वेने प्रवास करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. आयआरसीटीसीने पँट्री कारमध्ये उपलब्ध पदार्थांच्या किमती वाढवल्या आहेत. पूर्व मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतून जाणाऱ्या गाड्यांमधील खाद्यपदार्थांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आयआरसीटीसीचे प्रादेशिक महाव्यवस्थापक राजेश कुमार यांनी माहिती दिली की गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही सुधारले आहे, त्यामुळे खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये वाढ करण्यात आली आहे. भाकर, डाळ, डोसा, सँडविच यासह अनेक पदार्थ महाग झाले आहेत.
रेल्वेत मिळणारे खाद्यपदार्थ महागले
आयआरसीटीसीने रेल्वेत मिळणाऱ्या पदार्थांच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. पण दिलासा देणारी बातमी आहे की स्थानकांवर उपलब्ध खाद्यपदार्थांच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत.
IRCTC ने पूर्व मध्य रेल्वेवरून जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रत्येक खाद्यपदार्थांच्या २ ते २५ रुपयांना वाढवल्या आहेत. पदार्थांच्या किमतींमध्ये वेगवेगळे दर वाढवण्यात आले आहे. IRCTC ने 70 वस्तूंची यादी जारी केली आहे, ज्यांच्या किमती बदलल्या आहेत.
खाद्यपदार्थ किती महाग झाले?
गाड्यांमधील पॅंट्री कारमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यानंतर नवीन दर यादी अशी काहीशी आहे.
समोसा ८ रु. होता तर तो १० रु. झाला आहे.
सॅंडविच १५ रु. होते तर ते २५ रु. झाला आहे.
बर्गर ४० रु होते तर ५० रु. झाला आहे.
ढोकळा (१०० ग्रॅम) २० रु होते तर ३० रु. झाला आहे.
ब्रेड पकोडा १० रु होता तो आता १५ रु. झाला आहे.
आलू वडा ७ रु होता तर तो आता १० रु. झाला आहे.
मसाला डोसा ४० रु होता तर तो आता ५० रु. झाला आहे.
भाकर ३ रु होती तर १० रु. झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.