Passport Services Alert: जर तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या या अलर्टची माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता.
केंद्र सरकारने सोमवारी पासपोर्टशी संबंधित सेवा शोधणाऱ्या लोकांनी बनावट वेबसाइट्स किंवा मोबाइल अॅप्लिकेशनला बळी पडू नका, असा इशारा दिला आहे.
सरकारी अलर्टमध्ये म्हटले आहे की, अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे की अनेक बनावट वेबसाइट्स आणि मोबाइल अॅप्स अर्जदारांकडून डेटा गोळा करत आहेत आणि प्रचंड फि आकारत आहेत.
" मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की अनेक बनावट वेबसाइट्स आणि मोबाईल अॅप्लिकेशन्स अर्जदारांकडून डेटा गोळा करत आहेत आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आणि पासपोर्ट संबंधित सेवांसाठी अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यासाठी अतिरिक्त फि आकारत आहेत," अलर्टमध्ये म्हटले आहे.
यापैकी काही बनावट वेबसाइट्स ओआऱजी(org) डोमेन नावाने नोंदणीकृत आहेत, काही IN सह नोंदणीकृत आहेत आणि काही डॉट कॉमवर रजिसेटर आहेत.
या बनावट वेबसाइट्सची नावे आहेत --
www.indiapassport.org
www.online-passportindia.com
www.passportindiaportal.in
www.passport-india.in
www.passport-seva.in
www.applypassport.org
अलर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, त्यामुळे भारतीय पासपोर्ट आणि संबंधित सेवांसाठी अर्ज करणार्या सर्व नागरिकांनी फसव्या वेबसाइट्सना भेट देऊ नये किंवा पासपोर्ट सेवेशी संबंधित पेमेंट करू नये, अन्यथा त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
पासपोर्ट सेवांसाठी भारत सरकारची फक्त एक अधिकृत वेबसाइट आहे-
पासपोर्ट सेवांसाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट passportindia.gov.in आहे ज्याची लिंक www.passportindia.gov.in आहे.
पासपोर्ट सेवांसाठी सरकारी अधिकृत अॅप देखील आहे-
अधिकृत मोबाइल अॅप एमपासपोर्ट (M Passport Seva) देखील वापरू शकतात, जे Android आणि iOS अॅप्लिकेशन स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.