IPPB GDS Recruitment 2022 : ग्रामीण डाक सेवकांच्या 650 पदांसाठी भरती

पात्रता - कोणत्याही शाखेतून पदवीधर आणि किमान दोन वर्षांचा अनुभव
IPPB GDS Recruitment 2022
IPPB GDS Recruitment 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ने 650 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी आज 10 मे पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 मे 2022 आहे. पात्र उमेदवार IPPB ippbonline.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरल्यानंतर 7 ते 10 दिवसांनी प्रवेशपत्र जारी केले जातील. परीक्षा जून 2022 मध्ये घेतली जाईल. (IPPB GDS Recruitment 2022)

जीडीएसच्या पदांवरील ही भरती दोन वर्षांसाठी असेल. कामगिरीवर पाहून कालावधी आणखी एक वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो.

पात्रता - कोणत्याही शाखेतून पदवीधर. आणि किमान दोन वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा - 25 ते 30 वर्षे. 30 एप्रिल 2022 पासून वयाची गणना केली जाईल. म्हणजेच, उमेदवाराचा जन्म 30/04/1987 पूर्वी झालेला नसावा आणि 30/04/2002 नंतर झालेला नसावा.

IPPB GDS Recruitment 2022
महागाईचा आणखी एक झटका! आटा, ब्रेड, बिस्किटांसह हे पदार्थ महागणार

कोणत्या राज्यात किती पदे रिक्त आहेत

आंध्र प्रदेश 34

आसाम 25

बिहार 76

छत्तीसगड 20

दिल्ली 4

गुजरात 31

हरियाणा 12

हिमाचल प्रदेश 9

जम्मू आणि काश्मीर 5

झारखंड 8

कर्नाटक 42

केरळ 7 एकूण 15

मध्य प्रदेश 32

महाराष्ट्र 71

ओडिशा 20

पंजाब 18

राजस्थान 35

तामिळनाडू 45

तेलंगणा 21

उत्तर प्रदेश 84

उत्तराखंड 3

पश्चिम बंगाल 33

पगार - रु.30,000/- प्रति महिना

ऑनलाइन लेखी परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल.

ऑनलाइन लेखी परीक्षेत आयपीपीबीच्या उत्पादन विषयातून 20 प्रश्न, 20 गुणांसाठी, बेसिक बँकिंग 20 प्रश्न, 15 प्रश्न जनरल अवेअरनेसमधून, 20 प्रश्न संगणक जागरूकता आणि डिजिटल पेमेंट्स 20 गुणांसाठी, 20 प्रश्न संख्यात्मक क्षमता. 20 गुणांचे प्रश्न, 15 गुणांचे 15 प्रश्न तर्काचे आणि 10 प्रश्न इंग्रजीतून 10 गुणांचे असतील. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.

अर्ज फी - रु 750

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com