Apple Charging : iPhone 15 होणार Android चार्जरने चार्ज! अॅपल आणणार हे खास तंत्रज्ञान

iPhone Charging with Android Charger : आयफोन वापरकर्त्यांना नेहमी फोनचा चार्जर सोबत ठेवावा लागतो
iPhone Charging with Android Charger
iPhone Charging with Android ChargerDainik Gomantak
Published on
Updated on

iPhone Charging with Android Charger : किमान अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये तरी चार्जिंगमध्ये अडचण येत नाही, कारण आता बहुतेक स्मार्टफोन्स यूएसबी टाइप-सी पोर्टसह येतात. म्हणजेच घरातून चालत असताना चार्जर सोबत ठेवायला विसरलात, तरी काही हरकत नसते.

परंतु अॅपल प्रेमींच्या बाबतीत असे घडत नाही. आयफोन वापरकर्त्यांना नेहमी फोनचा चार्जर सोबत ठेवावा लागतो, परंतु आता नुकत्याच समोर आलेल्या अहवालात असे समोर आले आहे की 2023 मध्ये अॅपल फोनची संख्या वाढवेल. ज्यातून चार्जिंगची ही समस्या सुटणार आहे.

(iphone Charging with Android Charger)

iPhone Charging with Android Charger
These People Should Not Eat Paneer : या लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर; आरोग्यासाठी ठरू शकते घातक

अहवालात असे नमूद केले आहे की, Apple पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्टवर स्विच करू शकते. Apple iPhone 15 मध्ये त्याच्या ग्राहकांसाठी USB टाइप-सी पोर्ट असू शकतो. त्यामुळे वापरकर्त्यांना Android फोनच्या चार्जरने सुद्धा चार्जिंग करता येणार आहे.

हे पोर्ट आता Apple iPhone-Airpods मध्ये उपलब्ध!

Apple iPhone असो किंवा कंपनीचे AirPods, या दोन्ही उपकरणांमध्ये चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी लाइटनिंग पोर्ट आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना नेहमी त्यांच्यासोबत चार्जर ठेवावा लागतो. कंपनीने MacBook आणि iPad Pro सारख्या काही उपकरणांसाठी USB Type-C चार्जिंगवर स्विच केले आहे.

पुढील वर्षी आगामी Apple iPhone 15 सह, कंपनी प्रथमच लाइटनिंग पोर्ट सोडू शकते आणि टाइप-सी पोर्ट ऑफर करू शकते. त्याच वेळी, आयपॅड, जे अद्याप लाइटनिंग पोर्टवर चालत आहे, या वर्षाच्या अखेरीस यूएसबी-सी पोर्टमध्ये अपग्रेड केले जाऊ शकते.

आयफोन आणि आयपॅड व्यतिरिक्त, फक्त एअरपॉड्स मॅजिक कीबोर्ड, मॅजिक ट्रॅकपॅड, मॅजिक माऊस यांसारखी अॅपल उत्पादने लाइटनिंग पोर्टसह शिल्लक राहतील. एवढेच नाही तर येत्या काही वर्षांत Apple आपल्या iPhone आणि iPad सारख्या मॉडेल्समध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्टही देऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com