आपले आर्थिक व्यवस्थापन योग्य रीतिने करणे महत्वाचे असते. एखाद्या तात्पुरत्या आधारावर किंवा तात्पुरत्या लक्ष्यावर नजर ठेवून, किंवा चुकीच्या उद्दिष्टासाठी योजना कधीही करू नये. योग्य रीतिने कर व्यवस्थापन केल्यास तुम्ही कमी कर तर भरताच पण त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातल्या विविध टप्प्यांसाठी ठरविलेल्या उद्दिष्टांसाठी बचत पण करता. आम्ही तुम्हाला अशा कर बचत योजना सांगणार आहोत ज्यात तुम्हाला काही मोठ्या परताव्यासह कर बचतीचा लाभ मिळतो. जाणून घेऊया ...
1. पीपीएफ-
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही 15 वर्षांच्या कालावधीत भरीव निधी जमा करु शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही सरकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. ही टक्के जोखीम मुक्त योजना आहे ज्यामध्ये व्याज दर तिमाही आधारावर सरकारद्वारे हस्तांतरित केला जातो. सरकार या योजनेवर 7.10 टक्के व्याज देत आहे. या योजनेत तुम्ही 500 रुपयांपासून ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता. यामध्ये तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते.
2.राष्ट्रीय पेन्शन प्रणाली-
नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये गुंतवणूक करुन तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरचे चांगले नियोजन करु शकता. यामध्ये तुम्ही रिटायरमेंट फंड आणि पेन्शन या दोन्हींचा पर्याय निवडू शकता. यामध्ये सेवानिवृत्ती निधीचे प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. या योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कलम 89C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. यासह, कलम 80CCD (E) अंतर्गत 50 हजार रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. अशाप्रकारे तुम्ही जास्तीत जास्त एकूण 2 लाख रुपयांची सूट मिळवू शकता.
3. पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना-
केंद्र सरकारने नुकतीच पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट स्कीममध्ये व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता 6.70 टक्क्यांऐवजी 7 टक्के व्याज मिळणार आहे. हा दर जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी लागू करण्यात आला आहे. तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त पाच वर्षांसाठी पैशांची गुंतवणूक करु शकता. मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळेल.
4. वॉलंटरी प्रोविडेंट फंड (ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी)-
पीएफ व्यतिरिक्त, तुम्ही ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवणूक करुन आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळवू शकता. यामध्ये गुंतवणुकीची मर्यादा नाही ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमच्या बेसिक सॅलरीच्या 100 टक्के रक्कम ऐच्छिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवू शकता. याद्वारे तुम्हाला भक्कम सेवानिवृत्ती निधी मिळवण्यात मदत होईल. या योजनेअंतर्गत तुम्हाला 8.10 टक्के दराने परतावा मिळतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.