महागाईचा फटका! नवीन LPG कनेक्शनसाठी भरावे लागणार जास्त पैसे

आजपासून लागू होणार्‍या नवीन दरांनुसार नवीन एलपीजी कनेक्शन घेणे किती महाग होईल?
LPG
LPGdainik gomantak
Published on
Updated on

देशातील विविध आघाड्यांवर लोकांना महागाईचे धक्के जाणवत आहेत. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आजपासून घरगुती गॅस कनेक्शन घेणे महाग केले आहे. नवीन घरगुती एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला आजपासून जास्त पैसे खर्च करावे लागतील कारण नवीन घरगुती एलपीजी कनेक्शनच्या सिक्युरिटी डिपॉझिटचे दर वाढवण्यात आले आहेत. नवे वाढलेले दर आजपासून लागू झाले आहेत. (LPG Gas Connection Rate Increased)

आजपासून लागू होणार्‍या नवीन दरांनुसार नवीन एलपीजी कनेक्शन घेणे किती महाग होईल?

ग्राहकांना आता प्रत्येक नवीन गॅस कनेक्शनसाठी 1450 रुपयांऐवजी 2200 रुपयांची सुरक्षा ठेव जमा करावी लागणार आहे. म्हणजेच, प्रत्येक नवीन गॅस कनेक्शनसाठी थेट ठेव दर 750 रुपयांनी वाढले आहेत.

LPG
घरगुती गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढले | domestic LPG prices hiked again | Gomantak Tv

नवा रेग्युलेटरही घ्यावा लागणार

गॅस रेग्युलेटरची किंमतही 150 रुपयांवरून 250 रुपयांपर्यंत वाढली आहे. पाईपसाठी 150 रुपये आणि पासबुकसाठी 25 रुपये वेगळे द्यावे लागतील. अशाप्रकारे, सिक्युरिटीसाठी 2200 रुपये + गॅस रेग्युलेटरसाठी 250 रुपये + पाईपसाठी 150 रुपये + पासबुकसाठी 25 रुपये आणि गॅस स्टोव्हसारखे इतर खर्च, नवीन गॅस सिलेंडरसाठी एकूण 3690 रुपये मोजावे लागतील. जर एखाद्या व्यक्तीने नवीन गॅस कनेक्शनसह दोन नवीन सिलिंडर घेतले तर त्याला 4400 रुपये द्यावे लागतील.

5 किलोच्या गॅस सिलेंडरची सुरक्षा ठेवही महाग

इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएलने सांगितले की 5 किलोच्या सिलिंडरची सुरक्षा ठेवही आता 800 रुपयांवरून 1150 रुपयांवर बदलली आहे. नवीन नियमांनुसार त्याच्या पाईप आणि पासबुकसाठी अनुक्रमे 150 रुपये आणि 25 रुपये खर्च करावे लागतील.

LPG
एलपीजी दरवाढीविरोधात महिला कॉँग्रेसचा निषेध | GPMC Potest against LPG price hike | Gomantak Tv

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असलेल्यांसाठीही सिलिंडर महाग

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असलेले ग्राहक त्यांच्या कनेक्शनवर सिलिंडर त्यांनी दुसरा सिलिंडर घेतल्यास त्यांना वाढीव सुरक्षा रक्कम भरावी लागेल. नवीन कनेक्शन रेग्युलेटरसाठी ग्राहकांना आता 150 रुपयांऐवजी 250 रुपये खर्च करावे लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com