भारताची रिटेल पेमेंट सिस्टम युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि सिंगापूरची पेमेंट सिस्टम पे नाऊ (PayNow) लिंक करण्यात आले आहेत. 21 फेब्रुवारी 2023 रोजी भारत आणि सिंगापूर यांच्यात हा पैसे व्यव्हारासाठी हे लिंक करण्यात आली आहे.
या लिंकेजमुळे दोन्ही देशांच्या वापरकर्त्यांना क्रॉस सीमेवर जलद आणि जास्त पैसे खर्च करता येतील. याचा सर्वाधिक फायदा विद्यार्थी, व्यावसायिक, अनिवासी भारतीय आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे.
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि सिंगापूरच्या चलन प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक रवी मेनन यांनी UPI-PayNow लिंकेज वापरून टोकन व्यवहारांद्वारे सुविधा सुरू केली. सिंगापूरच्या 'युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI)' आणि 'PAYNOW' दरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे क्रॉस-बॉर्डर कनेक्टिव्हिटी सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यावेळी उपस्थित होते.
यामुळे क्रॉस बॉर्डर फिनटेक कनेक्टिव्हिटीची नवी सुरुवात केली आहे. या लिंकेजमुळे दोन्ही देशांतील लोकांना कमी किमतीचा रिअल-टाइम पेमेंट पर्याय उपलब्ध होईल आणि रेमिटन्समध्ये वाढ होईल. याचा सर्वाधिक फायदा विद्यार्थी, व्यावसायिक, अनिवासी भारतीय आणि त्यांच्या कुटुंबियांना होईल.
UPI- PayNow ग्राहकांना कशी मदत करेल?
UPI-PayNow एकत्रीकरणामुळे कोणत्याही देशातील दोन जलद पेमेंट सिस्टमच्या वापरकर्त्यांना त्यांच्या संबंधित मोबाइल अॅप्सद्वारे त्वरीत, सुरक्षितपणे आणि परवडण्याजोग्या सीमा ओलांडून पैसे पाठवता येतील. बँक खाती किंवा ई-वॉलेट (VPA) मध्ये ठेवलेल्या निधीसाठी, फक्त UPI-ID, सेलफोन नंबर किंवा आभासी पेमेंट पत्ता वापरून भारतातून पैसे पाठवणे किंवा प्राप्त करणे शक्य आहे.
पैसे पाठविण्याची मर्यादा किती आणि लिंक बँका कोणत्या?
भारतीय वापरकर्ते सुरुवातीला दिवसाला 60,000 रुपये (सुमारे 1,000 सिंगापूर डॉलर्सच्या समतुल्य) पाठवू शकतात.
सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक आणि आयसीआयसीआय बँक पैसे पाठवण्याची किंवा स्वीकारण्याची सुविधा देईल. त्याच वेळी, अॅक्सिस बँक आणि डीबीएस इंडिया फक्त पैसे मिळवण्यासाठी सुविधा देतील. सिंगापूरमधील वापरकर्त्यांसाठी, ही सेवा DBS-सिंगापूर आणि लिक्विड ग्रुप (एक नॉन-बँक वित्तीय संस्था) द्वारे प्रदान केली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.