ऑक्टोबर महिन्यात भारताचे औद्योगिक उत्पादन 3.2 टक्क्यांनी वाढले

आयआयपी 20 टक्क्यांनी वाढला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 17.3 टक्क्यांनी घसरला होता.
Indias industrial production grew by 3.2 percent in the month of October
Indias industrial production grew by 3.2 percent in the month of October Dainik Gomantak
Published on
Updated on

भारताच्या औद्योगिक उत्पादनात वाढ झाली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, भारताचे औद्योगिक उत्पादन यावर्षी ऑक्टोबर महिन्यात 3.2 टक्क्यांनी वाढले आहे, परंतु सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ते कमी झाले आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने जाहीर केलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) च्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2021 मध्ये, उत्पादन क्षेत्राच्या उत्पादनात 2 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.

तर ऑक्टोबरमध्ये खाण उत्पादनात 11.4 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय वीज निर्मितीमध्ये (electric Power generation) 3.1 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी, ऑक्टोबर 2020 मध्ये देशातील औद्योगिक उत्पादन 4.5 टक्क्यांनी वाढले. तर, या वर्षी एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान, आयआयपी 20 टक्क्यांनी वाढला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 17.3 टक्क्यांनी घसरला होता.

Indias industrial production grew by 3.2 percent in the month of October
SBI च्या नेट बँकिंग सेवा 'या' दिवशी 5 तास बंद!

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक घडामोडी कमी झाल्यामुळे एप्रिल 2020 मध्ये औद्योगिक उत्पादनात 57.3 टक्के घट झाली होती. औद्योगिक उत्पादन हे IIP (इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन) द्वारे मोजले जाते. ऑक्टोबर महिन्यात औद्योगिक उत्पादन 4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा होती. ऑक्टोबर 2021 साठी IIP चा द्रुत अंदाज 133.7 इतका होता.

मुख्यतः गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी बेसमुळे गेल्या काही महिन्यांपासून औद्योगिक उत्पादन वाढत आहे, परंतु आधारभूत परिणाम कमी होत असल्याचे ताज्या आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला होता, त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या गतीवरही परिणाम झाला होता. याशिवाय गेल्या वर्षी घातलेल्या निर्बंधांमुळे कारखान्यांच्या उत्पादनात घट झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com