
Indian Railways Update: भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी सुविधा देत असते. या अनुषंगाने आता रेल्वे तिकीट बुकिंग प्रणाली अद्ययावत करण्यात गुंतली आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या ऑनलाइन प्रवासी तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी काम करत आहे, जेणेकरुन प्रवाशांना तिकीट बुकिंग तसेच प्रवास करण्याची सुविधा मिळू शकेल. यासोबतच प्रवाशांची मागणीही पूर्ण होऊ शकते.
जाणून घ्या एका मिनिटात किती तिकिटे बुक होतात?
रेल्वेने (Railway) सांगितले की 'नेक्स्ट जनरेशन ई-तिकीटिंग (एनजीईटी) प्रणाली सातत्याने अपग्रेड केली जात आहे. या आकडेवारीवरुन तुम्हाला याची कल्पना येऊ शकते की, 2016-17 मध्ये प्रति मिनिट 15,000 तिकिटे काढली जात होती, तर 2017-18 मध्ये प्रति मिनिट 18,000 आणि 2018-19 मध्ये प्रति मिनिट 20,000 तिकिटे कापली जात आहेत.
रेल्वेने माहिती दिली की, सध्या IRCTC वेबसाइटवर प्रति मिनिट 25,000 पेक्षा जास्त तिकिटे बुक करण्याची क्षमता आहे. दुसरीकडे, आत्तापर्यंतच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाल्यास, 5 मार्च 2020 रोजी एका मिनिटात विक्रमी 26,458 तिकिटे बुक झाली होती.
वास्तविक, 5 मार्च 2020 रोजी तिकीट बुकिंगमध्ये मोठी वाढ दिसून आली कारण हा विक्रम त्या वर्षी होळीपूर्वी शेवटच्या क्षणी केलेल्या बेहिशेबी बुकिंगमुळे झाला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.