Post Office
Post Office Dainik Gomantak

देशभरात उघडणार 10,000 नवीन पोस्ट ऑफिस, ग्राहकांना घेता येणार नवीन सुविधांचा लाभ!

ost Office Services: कोरोना महामारीच्या काळात पोस्ट ऑफिसने 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंची डिलिव्हरी केली आहे.
Published on

भारतीय पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. आता पोस्ट ऑफिसने मोठा निर्णय घेतला आहे, की देशभरात 10,000 नवीन पोस्ट ऑफिस उघडले जातील. यामुळे सरकारी योजना लोकांच्या घराघरात पोहोचतील.

पोस्ट ऑफिसच्या (Post Office) आधुनिकीकरणासाठी संपूर्ण 5,200 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहेत. सीआयआय परिषदेत पोस्ट ऑफिसच्या आधुनिकीकरणाबाबत बोलताना पोस्ट विभागाचे सचिव अमन शर्मा म्हणाले की, आता पोस्ट ऑफिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या नवीन तंत्रज्ञानानुसार पोस्ट ऑफिस बनवता येईल, असा सरकारचा प्रयत्न आहे. जेणेकरून घरबसल्या सुविधांचा लाभ घेता यईल.

* लोकांना सरकारी सुविधा घरपोच मिळतील
बदलत्या काळानुसार पोस्ट ऑफिसच्या कामकाजात बदल व्हायला हवा, असा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी आता पोस्ट ऑफिस कोणत्याही वस्तूंच्या वितरणासाठी ड्रोनची मदत घेणार आहे. अलीकडे गुजरातमध्ये याची सुरुवात झाली आहे. ड्रोनच्या मदतीने अनेक सरकारी सेवांचा लाभ तुमच्या घराच्या दारात उपलब्ध होणार आहे. आयटी प्रकल्पांतर्गत पोस्ट ऑफिसचे आधुनिकीकरण केले जात आहे.

* कोरोनाच्या काळात पोस्ट ऑफिसने बजावली महत्वाची भूमिका
कोरोना महामारीच्या (Corona) काळात पोस्ट ऑफिसने खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महामारीच्या काळात पोस्ट ऑफिसने 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंची डिलिव्हरी केली आहे. सरकारच्या 5,200 कोटी रुपयांच्या वाटपानंतर पोस्ट ऑफिसला तंत्रज्ञानाने जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Post Office
मैदा, रवा, पिठाच्या निर्यातीवर बंदी, वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी उचललं पाऊल

* 10,000 नवीन पोस्ट ऑफिस उघडले जातील
सचिव अमन शर्मा यांनी देखील सांगितले की 10,000 नवीन पोस्ट ऑफिस उघडण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळाली आहे. आता भारतातील (India) एकूण पोस्ट ऑफिसची संख्या 1.7 लाख होईल. देशातील प्रत्येक भागात 5 किमीच्या परिघात बँका आणि पोस्ट ऑफिससारख्या अत्यावश्यक सुविधा असाव्यात, हे सरकारचे ध्येय आहे. यामुळे लोकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, वस्तूंची डिलिव्हरी आणि वितरण करण्यासाठी आणि बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी कुठेही धावपळ करावी लागणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com