Sugar Price: साखरेचा गोडवा राखण्यासाठी सरकारची पावले, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा

Price Hike: खरे तर सणासुदीच्या काळात मैदा, साखर व इतर गोष्टींचा वापर वाढतो. अशा स्थितीत सणासुदीच्या काळात महागाई रोखत सर्वसामान्यांना दिसाला देण्याकडे सरकाचा कल आहे.
Indian Government Imposes Stock Limit On Sugar To Control Price Hike.
Indian Government Imposes Stock Limit On Sugar To Control Price Hike.Dainik Gomantak
Published on
Updated on

Indian Government Imposes Stock Limit On Sugar To Control Price Hike:

देशात सणासुदीला सुरुवात झाली असून लग्नसराईही तोंडावर आहे. नवरात्री, दिवाळीसारखे सण पुढे आहेत. अशा परिस्थितीत देशातील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. खरे तर देशात सण सुरू होताच साखरेचे भाव वाढू लागले आहेत.

टोमॅटो, कांदा, डाळी, तांदूळ, गहू यानंतर आता साखरेच्या वाढत्या उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने साठा मर्यादेचा नियम लागू केला आहे.

याअंतर्गत दुकानदारांना एका निश्चित मर्यादेपेक्षा जास्त साखर साठा ठेवता येणार नाही. दुकानदारांनी विहित मर्यादेपेक्षा जास्त साठा ठेवल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई होऊ शकते.

Indian Government Imposes Stock Limit On Sugar To Control Price Hike.
दिलासादायक! देशभरात ऑगस्टमध्ये दर दिवशी सुरू झाल्या 493 कंपन्या

खरे तर सणासुदीच्या काळात मैदा, साखर व इतर गोष्टींचा वापर वाढतो. अशा स्थितीत सणासुदीच्या काळात महागाई वाढण्याची शक्यता कायम आहे.

त्यामुळे साखरेचे दर नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने ही पावले उचलली आहेत.

Indian Government Imposes Stock Limit On Sugar To Control Price Hike.
Foreign Exchange Reserves: चिंताजनक! परकीय चलन साठ्याने गाठली 4 महिन्यांतील निचांकी पातळी

साठा मर्यादेसोबतच केंद्र सरकारनेही साखर स्वतः बाजारात विकण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात सरकार पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये 13 लाख टन साखरेचा कोटा सोडणार आहे.

सरकारच्या या पावलामुळे दुर्गापूजा आणि दिवाळीसह इतर सणांच्या काळात साखरेचे भाव स्थिर राहतील आणि मागणी वाढल्याचा त्याच्या किमतीवर विशेष परिणाम होणार नसल्याचा अंदाज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com