Salary Hike 2023: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, तुमचा पगार 10 टक्क्यांनी वाढणार; सर्वेक्षणातून...

Pay Hike Latest News: भारतातील कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 9.8 म्हणजेच सुमारे 10 टक्के वाढ करु शकतात.
Employees
EmployeesDainik Gomantak

Salary Hike 2023: नोकरी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. तुम्हीही नोकरी करत असाल आणि अप्रेजलची वाट पाहत असाल, तर यावेळी भारतातील कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 9.8 म्हणजेच सुमारे 10 टक्के वाढ करु शकतात. हे गेल्या वर्षी 2022 पेक्षा किंचित जास्त आहे. 2022 मध्ये हा आकडा 9.4 टक्के होता.

परफॉर्मस पगारात मोठी वाढ होणार आहे

कॉर्न फेरीच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, जे कर्मचारी (Employees) चांगले काम करत आहेत त्यांच्यासाठी ही वाढ जास्त असेल.

Employees
Investment: बँक बुडाली तर तुमच्या पैशाचे काय? नुकसान कसे टाळायचे जाणून घ्या...

2020 मध्ये हा आकडा 6.8 टक्के होता

सर्वेक्षणात 800,000 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या अंदाजे 818 संस्थांचा समावेश करण्यात आला. या सर्वेक्षणानुसार 2023 मध्ये भारतात (India) पगारात 9.8 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. 2020 मध्ये महामारीने प्रभावित झालेल्या वर्षात पगारवाढ 6.8 टक्क्यांपेक्षा खूपच कमी होती, परंतु सध्याच्या वाढीचा कल मजबूत आणि चांगली परिस्थिती दर्शवतो.

तंत्रज्ञानामध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ अपेक्षित आहे

डिजिटल क्षमता निर्माण करण्यावर भारताच्या वाढत्या फोकसच्या अनुषंगाने, सर्वेक्षणानुसार जीवन विज्ञान आणि आरोग्य सेवा आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढ अनुक्रमे 10.2 टक्के आणि 10.4 टक्के असेल.

Employees
Jan Dhan Yojana: जन धन योजनेतर्गंत तुमच्या खात्यात येणार 10 हजार रुपये, जाणून घ्या कसे

कोणत्या क्षेत्रासाठी किती वाढ अपेक्षित आहे?

इतर काही क्षेत्रांसाठी, ही वेतनवाढ सेवा क्षेत्रासाठी 9.8 टक्के, वाहनांसाठी 9 टक्के, रसायनांसाठी 9.6 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी 9.8 टक्के आणि किरकोळ विक्रीसाठी 9 टक्के असा अंदाज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com